शशांक केतकर यांच्या हॉटेल “आईच्या गावात” बाबत हि वाईट बातमी

मराठी सृष्टीतील अनेक कलाकार साईड बीजनेस सांभाळताना दिसतात. अनेक जण त्यासाठी आपले स्वतःचे हॉटेल सूरु करण्याचा व्यवसाय सुरू करतात. यात कोंडाजी बाबा फेम आनंद काळे यांची देखील कोल्हापुरला दोन हॉटेल्स आहेत. त्याशिवाय प्रिया बेर्डे हिनेही पुण्यात आपले हॉटेल सुरू करून या व्यवसायात उडी घेतली. तर हे मन बावरे फेम अभिनेता शशांक केतकर याने देखील स्वतःचे आईच्या गावात नावाने पुण्यात हॉटेल सुरू केले. पण आता त्याबाबतची हि वाईट बातमी समोर आली आहे.

शशांक केतकर याबाबत म्हणतो, शाळा -कॉलेजमध्ये असताना आपलं स्वतःचं हॉटेल असावं असं स्वप्न पाहिलं होतं. पुण्यात “आईच्या गावात” नावाने हॉटेल सुरू केलं. गेली तीन ते चार वर्षे आई बाबा, पत्नी प्रियांका, हॉटेलचा स्टाफ यासर्वानी ते उत्तम सांभाळलं. पण काही खाजगी कारणास्तव हे हॉटेल आता बंद करत असल्याचे त्याने म्हटले आहे. त्याच जागेवर कोणाला हॉटेल चालवायचे असल्यास शशांकने आपल्याशी संपर्क साधण्याची विनंती केली आहे. पण त्याच्या फॅन्सनी हॉटेल न विकण्याचा सल्ला देत हॉटेल चालूच ठेव ते एक उत्तम हॉटेल असून आमची फेमस जागा असल्याचेही सांगितले आहे. त्यामुळे हॉटेल तूच चालावं आम्ही तेथेच येणार असा गोड़ सल्लाही अभिनेता शशांक केतकर याला चाहत्यांनी दिला आहे.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *