शक्तिमान मधील किलविषची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याची मुलगी आहे ही सुंदर अभिनेत्री

९० च्या दशकातील बहुतेक मालिका ह्या लहानग्यांसाठी खास आकर्षणाच्या ठरल्या होत्या. यातील शक्तिमान ही एक विशेष आवडतीची मालिका ठरली होती परंतु काही अडचणीमुळे तसेच काही प्रासंगिक वादामुळे ह्या मालिकेचे प्रक्षेपण थांबवण्यात आले होते. शक्तिमान प्रमाणे ही चिमुरडी आपल्या जीवाची पर्वा न करता टेरेसवर जाऊन त्याच्याचप्रमाणे फिरण्याचा प्रयत्न करत होती या प्रयत्नामुळे त्यांच्या जीवाला धोका असल्याचे लक्षात येताच मालिका आटोपती घेण्यात आली होती.

परंतु मालिकेतील शक्तिमान, गीता विश्वास, तमराज किलविष यासारखी अनेक पात्र रसिकांच्या आजही स्मरणात आहेत. मालिकेत तमराज किलविष हे विरोधी पात्र अभिनेते सुरेंद्र पाल यांनी साकारले होते. सुरेंद्र पाल यांनी अनेक ऐतिहासिक, धार्मिक मालिकांमध्ये विविधांगी तसेच अनेक महत्वाच्या भूमिका बजावल्या आहेत त्यातीलच तमराज किलविष ह्या पात्राचेही विशेष कौतुक झाले. सुरेंद्र पाल यांना दोन अपत्ये रिचा आणि रवी. त्यापैकी रिचा पनाई ही बॉलिवूड, टॉलिवूड तसेच मॉलिवूड क्षेत्रात कार्यरत आहे. सुरुवातीला तिने किंगफिशर एअरलाईन्स मध्ये एअरहोस्टेसचे काम पाहिले होते. यासोबत भीमा ज्वेलरीसाठी तिने मॉडेलिंगचे काम केले आहे. २०१६ सालच्या ट्राफिक या बॉलिवूड चित्रपटात तिने श्रुती साकारली होती. याशिवाय बँकॉक समर, सँडविच, चंदामामा कथालू, लवकुशा, बुगुरी यासारख्या अनेक तेलगू, मल्याळम तसेच कन्नड चित्रपटात तिने प्रमुख नायिकेच्या भूमिका बाजवल्या आहेत.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *