शका लका बुम बुम मालिकेतील हा बालकलाकार आता दिसतोय इतका स्मार्ट…सैराट मधील “परश्याची” साकारणार भूमिका

शका लका बुम बुम ही स्टार प्लस या वाहिनीवरील मालिका एके काळी बालचमुंची आवडती मालिका होती. आजही कित्येकांना ह्या मालिकेचे कथानक स्मरणात असेल. मुळात २००१ साली दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या ह्या मालिकेला छोट्या चाहत्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत होता त्यानंतर अनेक वाहिन्यांवर ही मालिका पुढे देखील प्रसारित करण्यात आली. संजू नावाच्या मुलाची जादूची ही पेन्सिल काय काय धमाल घडवून आणते हे पाहणे तितकेच रंजक होत चालल्याने ह्या मालिकेने अनेक वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन केले. यातील ह्या बालकलाकाराचे नाव आहे “किंशुक वैद्य”.

नुकताच मराठीतील “सैराट” चित्रपटाचा सिक्वल असलेला “धडक” हा सिनेमा येऊन गेला . चित्रपटाची प्रेमकहाणी मराठी रसिकांपासून थेट बॉलिवूड रसिकांना भावल्याने तशाच धाटणीची प्रेमकथा छोट्या पडद्यावर साकारण्याचे काम सध्या जोरात सुरू आहे. अँड टीव्ही चे विष्णू शंकर सैराट ची प्रेमकथा “जात ना पुछो प्रेम की ” ह्या मालिकेद्वारे प्रेक्षकांसमोर आणत आहेत. छोट्या पडद्यावर अशी मालिका साकारल्याने लोकांच्या घराघरात ती पोहचेल आणि तितकीच प्रसिद्धी देखील मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. मालिकेत किंशुक वैद्य हा परश्याच्या भूमिकेत दिसणार आहे तर आर्चीची भूमिका अभिनेत्री प्रणाली राठोड साकारणार आहे. मालिकेत उत्तरप्रदेशातील आर्ची आणि परश्या प्रेक्षकांना किती भावतील हे पाहणे तितकेच रंजक असल्याने , हिंदी भाषिक तसेच या वाहिनीचा प्रेक्षकवर्ग त्यांना किती आपलेसे करतील हे मालिका पाहिल्यावरच ठरेल. तुर्तास मराठीतील आर्ची परश्याची ही जोडी छोट्या पद्द्यावरही झळकते आहे ही खूप महत्त्वाची बाब म्हणावी लागेल.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *