“वेडात मराठे वीर दौडले सात” – या सात मावळ्यांचे हे स्मारक .. कवितेमगचा खरा इतिहास जाणून घेण्यासाठी फोटो

“वेडात मराठे वीर दौडले सात” ही कुसुमाग्रजांची कविता १६७४ सालच्या घटनेची आठवण करून देते. सभासदातील सरनोबत म्हणून “कुडतोजी गुजर ” महाराजांचे एक विश्वासू सदस्य म्हणून ओळखले जातात. स्वराज्य स्थापनेच्या अनेक महत्वाच्या कामगिरीत त्यांचा मोलाचा वाटा असल्याचे बोलले जाते. म्हणूनच महाराजांनी त्यांना “प्रतापराव” ही पदवी बहाल केली होती. याचमुळे ते ‘ प्रतापराव गुजर ‘ नावाने ओळखले जाऊ लागले. कोल्हापूर येथील गडहिंग्लज मधील नेसरी खिंडीत घडलेली घटना त्यांच्या कार्याची प्रचिती निदर्शनास आणून देते.

करनुल चा जहागीरदार बहलोलजी खान याच्या होणाऱ्या अत्याचाराची बातमी कळताच प्रतापराव गुजर गनिमिकाव्याने त्याच्यावर चाल करून गेला. यामुळे सर्व सैन्यानिशी बहलोल खान शरण आला. शरण आलेल्या बहलोल खानाला प्रतापरावाने मोठ्या मनाने माफ केले. महाराजांना ही बातमी त्याला कळताच तातडीने फर्मान काढले “बहलोल खानाला मारल्याशिवाय आम्हाला तोंड दाखवू नाका”. त्यामुळे महाराजांचा आदेश स्वीकारत प्रतापराव गुजर हा विसाजी बल्लाळ, सिद्दी हलाल, कृष्णाजी भास्कर, दीपाजी राउत राव, विठोजी शिंदे, विठ्ठल पिलाजी अत्रे या सहा मावळयांसोबत बहलोल खानाच्या तब्बल बारा हजार सैन्यावर चाल करून गेला.
बहलोल खान नेसरीच्या खिंडीजवळ असल्याची माहिती मिळवली आणि मग काय या सात मावळ्यांनी बहलोल खानाच्या शेकडो सैन्याचा फडशा पडला. एवढ्या मोठ्या सैन्याला हाणून पाडण्यासाठी अतोनात प्रयत्न करत झुंज देत या सातही मावळ्यांना वीरमरण आले. ही बातमी कळताच महाराजांना खूप दुःख झाले.


नेसरीच्या ठिकाणी या सात मावळ्यांचे स्मारक उभे करण्यात आले आहे. तसेंच प्रतापराव गुजर यांचा अश्वारूढ पुतळा देखील येथे उभारण्यात आला आहे. ” दगडावर दिसतील अजुनी तेथल्या टाचा, ओढ्यात तरंगे अजुनी रंग रक्ताचा” येथील गावकरी अजूनही सांगतात की, ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी या पाण्याचा रंग लाल होताना दिसतो. अश्या मावळ्यांना आमचा कोटी कोटी प्रणाम ..

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *