” विष्णुपंत छत्रे “- भारतातील नव्हे तर आशियातील पहिल्या वाहिल्या सर्कशीचा जनक आहे एकमेव ‘मराठी माणूस’.

“विष्णुपंत मोरेश्वर छत्रे” हे भारतीय तसेच एशियातीलही ‘सर्कशीचे जनक ‘ म्हणून ओळखले जातात. १८४० साली अंकलखोप , सांगली , महाराष्ट्र येथे त्यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांना घोडेस्वारीची अत्यंत आवड होती. त्यामुळे यातच प्रावीण्य मिळवले. १८७९ साली मुंबईत एक विदेशी सर्कशीचे खेळ दाखविण्यात आली. यावेळी या सर्कशीचे संचालक विल्यम चिर्णी यांनी ” घोडेस्वारी हे आमचे वैशिष्ट्य, भारतातील कोणीही आमच्यासारखी कसरत करूच शकणार नाही” . असे म्हणत भारतीयांची खिल्ली उडवली.

या घटनेचा रोष त्यांच्या मनात राहिला. पुढे काही महिन्याच्या अवधीतच सर्कशीचे प्रशिक्षण सुरू केले, भरपूर सराव आणि अभ्यास केला. २४ नोव्हेंबर १८७९ रोजी कुरुंदवाड येथे “ग्रँड इंडियन सर्कस” चा पहिला वाहिला प्रयोग काही निवडक लोकांसमोर सादर करण्यात आला. जंगली प्राण्याच्या खेळासोबत घोडेस्वारी, प्राचीन युद्ध कला,देशी विदेशी कसरती, झुले झुलणारे कलाकार यांचा समावेश करण्यात आला. या कार्यात त्यांच्या पत्नीचाही मोठा वाटा असल्याचे सांगितले जाते.

भारतभरच नव्हे तर अगदी परदेशात देखील या सर्कशीचे प्रयोग सादर करण्यात आले. यामुळे या सर्कशीला भरपूर यश आणि प्रसिद्धी मिळाली. २० फेब्रुवारी १९०५ रोजी विष्णुपंत छत्रे यांचे निधन झाले. पुढे या सर्कशीचा कारभार त्यांचे धाकटे बंधू काशीनाथपंत छत्रे यांनी सांभाळले. त्यांनी देखील या सर्कशीला व्यापक स्वरूप प्राप्त करून दिले.स्वातंत्र्य लढ्यात देखील त्यांचा मोठा वाटा असल्याचे बोलले जाते. लोकमान्य टिळक यांचे गुरू केरूनाना छत्रे हे काशीनाथपंत छत्रे यांचे घनिष्ठ मित्र त्यामुळे त्यांनी देखील नेते , क्रांतिकारक यांना या कार्यात मदत केली. त्यामुळेच या सर्कशीला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *