विनोदवीर “श्रेया बुगडे” हिच्या लग्नाचे कधीना न पाहिलेले हे 8 फोटो

‘चला हवा येऊ द्या’ मालिकेतून सर्वांना खळखळून हसवणारी अभिनेत्री श्रेया बुगडे हि मूळची मुंबईची. २ फेब्रुवारी १९८८ साली शेयाचा मुंबईत जन्म झाला. वडिलांचे नाव अरुण बुगडे ते एका खाजगी कंपनीत कार्यरत आहेत. तर आई नूतन बुगडे ह्या हाऊस वाइफ आहेत. श्रेया बुगडे हिला एक जुळी बहीणही आहे तीच नाव तेजल. st. xaviers high school मधून तिने शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मिठीबाई कॉलेज मधून उच्च शिक्षण घेतले. लहानपणापासूनच तिला नृत्याची आवड पण तिच्याही पेक्षा तिची बहीण सुंदर नृत्य करते असे तिने नुकतेच एका शो मध्ये सांगितले . टीव्ही वरील कलाकारांच्या नकला करणे तिला फार आवडायचे. तिची हि आवड पुढे तिला एकांकिका स्पर्धेमध्ये उपयोगी ठरली.

श्रेयाला एका गुजराती मालिकेत “चुट्टा छेड्डा” अभिनय करायची संधी मिळाली त्यापाठोपाठ एका हिंदी मालिकेतही ती दिसली त्या मालिकेचं नाव होत “थोडा हे बस थोडे कि जरुरत हे”. पुढे ‘तू तिथे मी’ , ‘अस्मिता’ , ‘फु बाई फु’, ‘फू बाई फु नया हे यह’ अश्या मालिकांत ती दिसली. झी वाहिनीच्या ‘फू बाई फु नया हे यह’ या मालिकेत तिने दाखवलेला अभिनयाला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. याच वाहिनीतील आणि मालिकेतील कलाकारांनी मिळून “चला हवा येउ द्या” कार्यक्रमाची निर्मिती केली. अत्यंत कमी कालावधीत श्रेयाने लोकांची माने जिंकत एकामागून एक मालिका करत गेली. चला हवा येउ द्या मालिकेत सुरवातीला सर्व पुरुष कलाकार विनोदी अभिनय साकारताना दिसायचे आणि त्यांना मानसी नाईक साथ देताना पाहायला मिळायची. पण काही कारणास्तव तिला ही मालिका सोडावी लागली. त्याची उणीव भरून काढण्यासाठी मालिकेत श्रेया बुगडे हिने एन्ट्री केली.

काही दिवसातच तिने चांगला जम बसवला आणि अख्या महाराष्ट्राला खदखदून हसवलं. श्रीदेवी असो, विद्या बालन असो किंवा दीपिका पदुकोण अगदी त्यांच्यासारखीच दिसणारी आणि त्यांच्या सारखं बोलणारी ह्यामुळे स्टिगजर तिची जादू पाहताना कलाकारांनी भांभावून जातात.
श्रेयाने २७ डिसेंबर २०१४ रोजी निखिल सेठ यांच्याशी विवाह केला. निखिल सेठ हे झी मराठी वाहिनीचे क्रीएटीव्ह हेड म्हणून काम पाहतात. चला हवा येउ द्या ह्या मालिकेसाठी त्यांनी विशेष योगदान दिले आहे. गेली १० वर्ष ते झी वाहिनीसाठी काम करत आहेत. त्यांच्या मेह्नितच फळ म्हणून झी ने नुकताच त्यांना अवॉर्ड देऊन हि सन्मानित केलंय. सध्या सहकुटुंब ते मुंबईत स्थायिक आहेत.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *