विक्याची बेस्ट फ्रेन्ड हि मराठमोळी अभिनेत्री, नुकतच केलं ह्या मराठमोळ्या अभिनेत्याशी लग्न..

लागीर झालं जी मालिकेतील विक्या म्हणजे निखिल चव्हाण याने आपल्या फेसबुक अकाउंट वर काही दिवसांपूर्वी आपल्या मैत्रिणीसोबतचा एक फोटो शेअर केला आणि त्याला लॉन्ग टाइम बेस्ट फ्रेन्ड असं टायटल टाकलं. मग फेसबुकवर दोघांच्या चर्चेला उधाण आलं, हि मुलगी कोण? असा प्रश्न अनेकांना पडला. बऱ्याच जणांनी कमेंट करून हि अभिनेत्री आहे का? असा प्रश्नही विचारला. हि मुलगी कोण, तिने कोणत्या मालिकांत आणि चित्रपटांत काम केलंय तसेच तिचा खरा लाईफ पार्टनर ह्याबद्दल थोडं जाणून घेऊयात..

विक्यासोबत दिसणाऱ्या ह्या महिलेचं नाव आहे पूजा पुरंदरे, आणि तीही एक उत्कृस्ट अभिनेत्री आहे. पूजा पुरंदरे ही मूळची पुण्याची. लहानपणापासूनच तिला नृत्याची आवड असल्याने भरतनाट्यमचे तिने प्रशिक्षण घेतले. पी जोग हायस्कूल मधून तिने शिक्षण घेतले. काशीबाई नवले महाविद्यालयात ११ वित शिकत असताना “तळातला वर्ग ” या नाटकात तिने सहभागी होऊन या क्षेत्रात पाऊल टाकले.

नामवंत” फिरोदिया करंडक ” साठी ” देवाचिया द्वारी” हे नाटक सादर केले. पुरुषोत्तम करंडक साठीही तिला काम करण्याची संधी मिळाली. देवयानी, सुंदर माझं घर तसेच लक्ष्य या मालिकेत ती झळकली. किती सांगायचंय मला, एंजल, भारतीय या चित्रपटात तिने महत्वपूर्ण भूमिका बजावल्या आहेत. विक्या नेही फिरोदिया करंडकसाठी अभिनय सादर केलेला, आणि विक्या हाही मूळचा पुण्याचा कदाचित इथेच दोघांची मैत्री झाली असावी.

अभिनेत्री पूजा पुरंदरे हिने विजय आंदळकर ह्या अभिनेत्यासोबत नोव्हेंबर २०१७ साली लग्न गाठ बांधली. विजय आंदळकर हा मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेता आहे. विजयने वकिलीचा पदवी देखील प्राप्त केली आहे. अभिनयाची आवड असल्याने या क्षेत्रात पाऊल टाकले. त्याने अभिनेता वैभव तत्त्ववादी आणि अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांच्या “मी अँड मिसेस सदाचारी मध्ये काम हि केले आहे.

तसेच ढोल ताशे , ७०८ दीक्षित , बाजीराव मस्तानी या चित्रपटात महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. स्टार प्रवाह वरील “गोठ ” या मालिकेचाही तो एक भाग बनला आहे. नुकतेच त्याने संजय जाधवच्या ” ये रे ये रे पैसा ” या चित्रपटात छोटीशी भूमिका साकारली आहे. अभिनेता विजय आंदळकर आणि पूजा पुरंदरे हे दोघे जरी पुण्याचे असले तरी कामानिमित्त ते मुंबईत स्थायिक आहेत.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *