“विकिशा”च्या लग्ना निमित्त या दोन प्रसिद्ध मिठाई दुकानात मिळणार मोफत पेढे

झी मराठीवर सध्या “विकिशा” म्हणजेच ईशा आणि विक्रांत सरंजामे यांच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. उद्या यांच्या लग्नाचा हा सोहळा तब्बल २ तासाच्या विशेष भागात तुम्हाला या वाहिनीवर अगदी धुमधडाक्यात साजरे केलेले पाहायला मिळणार आहे. फक्त एवढेच नाही तर या लग्न सोहळ्याचा आनंद आणखी द्विगुणित करण्यासाठी चक्क मिठाईची दुकानेही सज्ज झालेली पाहायला मिळत आहेत. बऱ्याच जणांना हि बातमी खोटी वाटेल पण हि अगदी १००% खरी बातमी आहे.

पुण्यातील प्रसिद्ध “काका हलवाई ” आणि ” प्रशांत कॉर्नर ” या ठिकाणी उद्या म्हणजेच १३ जानेवारीला ११ ते १ आणि ४ ते ७ या वेळेत ‘मोफत पेढ्यांचे वाटप’ करण्यात येणार आहे. खुद्द झी वाहिणीनेच याचा खुलासा केल्याने सर्वाना आश्चर्याचा धक्का बसला आहे. “काका हलवाई ” आणि ” प्रशांत कॉर्नर ” पुण्यातील प्रसिद्ध मिठाईचे ठिकाण मानले जाते.
रोजच खवय्ये यांच्या दुकानांत रंग लावताना पाहायला मिळतात. पण रविवारी उद्या म्हणजेच १३ जानेवारीला ११ ते १ आणि ४ ते ७ या वेळेत ‘मोफत पेढ्यांचे वाटप’ करण्यात येणार असल्याने आणि झी वाहिनी याचे चित्रीकरण करणार असल्याने मोठ्याच्या मोठ्या रांगा इथे पहायला मिळणार हे नक्की. विशेष म्हणजे या ठिकाणी जास्तीतजास्त लोकांना मिठाई मिळावी म्हणून वेगळे कॉउंटर्स हि लावले जाणार आहेत जेणेकरून लोक ‘मोफत पेढ्यांचे वाटप’चे मनोसोक्त आनदंड लुटतील. तुम्हीही पुण्यात राहणारे असाल तर नक्कीच ह्या मिठाईचा आस्वाद घायला आणि मोफत पेढे खायला विसरू नका.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *