astad kale speech

मनोरंजनाचे एक साधन म्हणजे आपल्या टीव्ही मालिका. परंतु हेच मनोरंजन करणाऱ्या मालिका जेव्हा प्रेक्षकांना कंटाळवाण्या वाटतात तेव्हा पर्यायाने आपण दुसऱ्या वाहिन्यांकडे वळतो. परंतु तिथेही अशा मालिका असतात ज्या टीव्ही वाहिनीवर वर्षानुवर्षे प्रसारित होत राहत असतात. केवळ टीआरपी वाढवण्यासाठी त्या मालिकेत अनेक विषय घुसडून प्रेक्षकांच्या डोक्याचा भुगा करण्या इतपत या मालिका अगदी नकोशा होऊ लागतात. याच कारणाने अशा मालिकांना वेळच्यावेळी आवर घालणे गरजेचे असते. प्रेक्षकांची हीच व्यथा अभिनेता अस्ताद काळे याने आपल्या पोस्टद्वारे सांगितली आहे. त्याने मांडलेले मुद्देही तुम्हा आम्हा सर्वानाच पटतील अशा स्वरूपाचे आहेत यावर विचार होणे गरजेचे आहे. पाहुयात त्याने नेमके काय म्हटले आहे ते….

marathi serial actors
marathi serial actors

नमस्कार. थोडी मोठी post आहे, पण कृपया वाचा. सहज डोक्यात आलेला विचार. खरंतर स्वप्नालीच्या डोक्यात आलेला. त्यावर थोड्या गप्पा झाल्यावर जे मुद्दे निघाले ते नमूद करू इच्छितो. लॉकडाऊनमधून हळूहळू सर्वच व्यवसाय पुन्हा उठू पाहतायत. त्यात आमचं क्षेत्रंही. आता तरी एखाद्या वाहिनीने जरा वेगळा केला तर? म्हणजे कसा? Prime timeलासुद्धा कायम Limited episodesच्या मालिका दाखवणे. उदाहरणादाखल १०० भागांच्या असं आपण धरून चालू. यातून प्रथमदर्शनी दिसणारे संभाव्य फायदे अस – १) कथा ठराविक भागांमधे पूर्ण सांगायची-दाखवायची असल्याने सुरुवात-मध्य-शेवट हे सूत्र नीट पाळून रंजकता राखली जाऊ शकते. २) १०० भाग म्हणजे साधारण ४ महिने(जर daily soap असेल तर). म्हणजे प्रत्येक मालिकेशी संबंधित व्यक्तीला ४ महिन्यांचीच बांधिलकी राहील. प्रमुख भूमिका करणाऱ्या नट-नट्यांचे, दिग्दर्शकांचे जे करार होतात,ते ४ महिन्यांचेच होतील. त्यांनाही आयुष्यात काहीतरी planning करता येईल. उदा:- एखाद्या नटाला/तंत्रज्ञाला जर ४ महिन्यांचं म्हणून ५ लाखाचं पॅकेज मिळालं तर तोही जरा शांतपणे नंतरचा विचार करून ठेवू शकेल. ३) कलाकार,लेखक,दिग्दर्शक,cameramen, या सगळ्यांनाच जरा स्थिरचित्तानी आणि मनापासून काम करता येईल. ४) Prime time slots ७-९ जर धरले, तर होतात ५. म्हणजे एका वर्षात एकूण किमान १५ कथानकं/विषय प्रेक्षकांसमोर आणता येतील!! ५) विषयानुसार कलाकार-लेखक-दिगदर्शक-तंत्रज्ञ यांची निवड होत असल्याने अनेकांना rolling आणि विविध विषयांची कामं मिळत राहतील. काम मिळणाऱ्यांची संख्याही वाढेल. ६) रटाळ/पाणी घातलेली illogical अशा ज्या टीका मालिकांवर होतात त्या कमी व्हायची शक्यता तरी निर्माण होईल!! ७) OTT platformsसमोर ताकदीनी उभं राहायचं असेल तर CONTENT IS THE ONLY GOD हे सूत्र पाळायला नक्कीच मदत होईल. (कारण मुद्दा क्र.१) ८) ठराविक भागांचं project असल्यानी budget पण वाढू शकेल(?) आणि खरंच सगळेच सुखावतील(?) हे सगळं कितपत शक्य आहे माहीती नाही, पण असं काहीतरी व्हावं असं खरंच वाटतं. नाहीतर तसेही काय ३३ कोटी विषय आहेतच विश्वाच्या अंतापर्यंत पुरवायला.(कदाचित नंतरही?) ता.क:- शेवटचं विधान हे आमच्या चर्चेत मी केलं होतं, स्वप्नालीनी नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *