लागीर झालं जी मालिकेच्या असिस्टंट डायरेक्टर चा विवाहसोहळा संपन्न…पत्नी आहे शितल पेक्षाही “ही” सुंदर अभिनेत्री

लागीर झालं जी मालिकेचे असिस्टंट डायरेक्टर ” सुशांत शशिकांत” यांनी नुकतेच लग्न केले असल्याचे कळते आहे. सुशांत शशिकांत यांनी कलर्स वाहिनीवरील “माझिया माहेरा” या मालिकेच्या असिस्टंट डायरेक्टर पदाची देखील धुरा सांभाळली आहे. लागीर झालं जी मालिकेच्या कलाकारा व्यतिरिक्त अनेक मालिकांतील आणि चित्रपटातील अभिनेते तसेच अभिनेत्रीनेही यांच्या लग्नाला हजेरी लावलेली पाहायला मिळाली. सोशिअल मीडियावर सध्या यांच्या लग्नाचे फोटो चांगलेच व्हायरल होताना पाहायला मिळताहेत. सुशांत याने लागीर झालं जी मालिकेत अभिनय केलेला आपण सर्वानी पहिलाच असेल.

सुशांतने नुकतेच अभिनेत्री “प्राजक्ता नवनाळे” सोबत अगदी थाटात लग्न उरकले असल्याचे समोर येत आहे. सुशांत आणि प्राजक्ताच्या लग्नात श्वेता शिंदे सह लागीर झालं जी मालिकेच्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. प्राजक्ता नवनाळेने कोरी पाटी या प्रोडक्शनची कबुतर ही वेबसिरीज केली आहे. या वेबसिरीजला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळाला आहे. याच निमित्ताने तिने एकदम कडक या शो मध्ये देखील हजेरी लावली होती. प्राजक्ता नवनाळे ही चला हवा येऊ द्या फेम अंकुर वाढवेची मैत्रीण आहे. अंकुरने नुकतेच विदर्भवासीयांसाठी अभिनय कार्यशाळा सुरू केल्या आहेत त्यात अंकुरच्या मदतीला प्राजक्ता देखील सहभागी झालेली पाहायला मिळते.
“Srushti Motion’s Media” यांनी हे लग्नाचे फोटोशूट करून आपल्या पेजवर शेअर केले आहेत त्यांच्या ओफिसिअल पेजवर तुम्हाला लग्नाचे आणखीन फोटो पाहायला मिळतील.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *