“लागींर…” मालिका फेम “जिजींना” नुकताच मिळाला विशेष पुरस्कार…पाहून अवाक व्हाल

लागींर झालं जी मालिकेत सध्या वेगवेगळी वळणे पाहायला मिळत आहे. अजिंक्य आणि शीतलच्या आयुष्यात एका नव्या पाहुण्याची एन्ट्री होणार आहे. त्यामुळे मालिकेतील भाग इथून पुढे विशेष काळजी चे दाखवले जाणार यात शंका नाही. मालिकेतील “जिजी ” ह्यांनी देखील आजवर आपली भूमिका तितकीच जबाबदारीने पार पाडली आहे. ही भूमिका ज्येष्ठ अभिनेत्री “कमल ठोके” या अतिशय सुरेख बजावताना दिसत आहेत. कमल ठोके ह्या एक अभिनेत्रीसोबत आदर्श शिक्षिका देखील आहेत.

सातारा येथील प्राथमिक झेडपी शाळेत त्यांनी मुख्याध्यापिकेची भूमिका चोख बजावली. ह्यातून त्यांनी सेवानिवृत्ती स्वीकारली असली तरी लागींर झालं जी मालिकेतून अभिनयाची आवड त्या जोपासताना दिसत आहेत. नुकताच त्यांना अभिनय क्षेत्रातील ह्या भरीव योगदानासाठी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने १० मार्च २०१९ रोजी विजय दिवस समारोह समिती ,कराड च्या वतीने त्यांना “विजयश्री पुरस्कार २०१९” ने सन्मानित करण्यात आले आहे.
अभिनय क्षेत्रात त्यांनी आजवर विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. नुकताच त्यांनी अभिनित केलेला “फाईट” चित्रपट प्रदर्शित झाला. याआधीही त्यांनी अनेक मंचावर आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. ह्याचीच दखल घेत त्यांना ह्या विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. “कमल ठोके उर्फ जिजींना” विजयश्री पुरस्काराने गौरविण्यात आल्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!!!

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *