‘लागींर झालं जी’ मालिकेतील शीतल आता पाहायला मिळणार मराठमोळ्या साडीमध्ये.. तिचे साडीतले फोटो होताहेत व्हायरल

‘लागींर झालं जी’ मालिकेत नुकताच अजिंक्य आणि शीतल दोघांचा विवाह सोहळा संपन्न झाला. आता ते दोघे आपल्या मामाच्या घरी राहायलाही गेलेत. लग्नानंतर आता शीतल मालिकेत आपल्याला यापुढे साडीतच पाहायला मिळणार यात शंका नाही. तिचे साडीतील काही फोटो नुकतेच सोशिअल मीडियावर चांगलेच गाजताहेत. ‘मुली साडीतच फार छान दिसतात राव’ असं कॅप्शन देऊन तिचे फोटो चांगलेच व्हायरल होताना पाहायला मिळताहेत.

‘लागींर झालं जी’ मालिकेत काही भाग पूर्वीच जेव्हा अजिंक्य शीतलचा ड्रेस घेऊन येतो आणि त्या ड्रेस मध्ये अजिंक्यची मामी शीतलला पाहते तेंव्हा मामी शीतलला चांगलच सुनावते. आमच्या घरी राहायचं असेल आणि अजिंक्यची बायको व्हायची असेल तर तिला ड्रेस मध्ये नव्हे तर साडीच घालावी लागेल अशी सक्त ताकीद देतात.

इतकाच नव्हे तर मामी शीतलला तिच्या घरी घेऊन जातात आणि घरच्या समोर हि शीतलला खडे बोल सुनावतात. ह्याच कारणामुळे लग्नानंतर आता शीतल आपल्याला मराठमोळ्या साडीतच पाहायला मिळणार आहे. डोक्यावर पदर, हातात लाल चुडा कपाळावर कुंकू हा शीतलचा मालिकेतील लग्नानंतरचा लूक लोकांना आधीपेक्षा जास्त पाहायला आवडेल यात शंका नाही.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *