लागींर झालं जी मधील “सिम्बाचे” खर नाव, गाव, शाळा पाहण्यासाठी …उत्कृष्ट तलवारबाजीचा व्हिडीओ पाहून अवाक व्हाल

लागींर झालं जी या झी वाहिनीच्या मालिकेला ताईसाहेबांच्या येण्याने एक वेगळे वळण लागले आहे. भैय्यासाहेब आणि जयडी यांना सरळमार्गी आणण्याचे काम सध्या ताईसाहेबांनी अगदी चोख बजावलेले पाहायला मिळत आहे. त्यात भर म्हणजे ताईसाहेबांचे चिरंजीव “संग्रामराव जगताप” यांनी तर भैय्यासाहेब यांच्यावर वेळोवेळी तोफ डागल्याचे दिसते. त्यामुळे मालिकेतील “सिम्बा” नावाचे पात्र चांगलेच भाव खाऊन जात आहे. ही भूमिका साकारणाऱ्या चिमुकल्याचे नाव आहे…”वेदराज अनपट”.

वेदराजने साकारलेला सिम्बा साऱ्यांचेच लक्ष वेधून घेताना दिसत आहे. त्याने साकारलेली ही रुबाबदार स्टाईल देखील मालिकेच्या प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसते आहे. वेदराजचा उत्कृष्ट तलवारबाजीचा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्ही देखील नक्कीच अवाक व्हाल… वैद्यराज ७ वर्षांचा असून तो दुसऱ्या इयत्तेत वाई साताऱ्यात शिकत आहेत.
वेदराजचे वडील सचिन अनपट हे सातारा येथील डिसीसी बँकेत नोकरी करत आहेत. सध्या त्यांचे कुटुंब वाई, सातारा येथे स्थायिक आहे. किसनविर महाविद्यालय येथून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले आहे शिवाय ते एक उत्कृष्ट गायक देखील आहेत. बँकेची नोकरी सांभाळत त्यांनी सृष्टी मोशन्स मीडियाच्या “बगाड यात्रेसाठी” शेतकरी गीत आणि इतर गाणी देखील गायली आहेत.
वेदराजचा अभिनय पाहता तो या क्षेत्रात नक्कीच यशस्वी कामगिरी करणार हे वेगळे सांगायला नको. वेदराजला त्याच्या पुढील वाटचालीसाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा!!!…

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *