“लाईका” नावाची अवकाशात गेलेली पहिली कुत्री. तिच्या बाबतीतील ही अपरिचित दुःखद घटना..

अंतराळात जाणार सर्वात पहिला भारतीय म्हणून राकेश शर्माचे नाव घेतले जाते. आजवर असे अनेक अंतराळवीर महिला असो किंवा पुरुष त्यांनी आपले नाव कोरले असल्याचे सांगितले जाते. परंतु या सर्वांच्या आधी अंतराळात जाणार सजीव मानव नाही तर एक रशियन कुत्री होती. बसला ना धक्का, हो तुम्ही अगदी बरोबर वाचताहेत. या कुत्रीचे नाव होते ” लाईका “. चला तर जाणून घेऊयात या इतिहासात नाव कोरलेल्या कुत्रीबाबत काय घडले ते…

अंतरळाविषयीची माहिती घेण्यासाठी रशियाने सर्वात आधी “स्पुतनिक १” हा उपग्रह अवकाशात सोडून यशस्वी चाचणी केली होती. त्यानंतर सजीवांवर हा प्रयोग होण्यासाठी तेथील वैज्ञानिकांनी हालचाली सुरू केल्या. यासाठी कुठल्याही स्वरूपाचा धोका न पत्करता त्यांनी मानवा ऐवजी कुत्र्यांचा वापर करण्यासाठी प्रयत्न केला. मग मॉस्कोच्या रस्त्यावरील जवळपास ३ वर्षाची “लाईका” ही कुत्री उचलली. आकाराने लहान असलेली ही कुत्री सहज बसावी यासाठी तिची निवड करण्यात आली होती.

एक छोट्याश्या पीजऱ्यात ठेऊन जवळपास २० दिवसांची ट्रेनिंगही तिला देण्यात आली होती. कारण अवकाशात जाणाऱ्या “स्पुतनिक २” या उपग्रहात तिच्यासाठी छोट्याशा जागेची व्यवस्था केली होती. एक महिनाभराच्या आतच हे उपग्रह बनवण्याची जबाबदारी तेथील वैज्ञानिकानी घेतली होती.”लाईका” परत येणार नाही याची पूर्ण कल्पना वैज्ञानिकाना असल्याने आधल्या दिवशी भावणावश होऊन एका वैज्ञानिकाने तिला आपल्या घरी नेले होते. तिचा हा अखेरचा दिवस म्हणून यीची भरपूर सेवादेखील करण्यात आली होती. संपूर्ण वेळ तीला हवे तसे खेळू बागडू दिले.

३ नोव्हेंबर १९५७ रोजी ” स्पुतनिक २ ” हे उपग्रह अवकाशात जाण्यासाठी सज्ज झाले. उपग्रहाच्या छोट्याशा जागेत तिला बंदिस्त करण्यात आले होते. तिला ऑक्सिजन मिळावा यासाठी पुरेशी व्यवस्था करण्यात आली होती. उपग्रह अवकाशात गेल्यावर मुख्य R-7 सस्टेंनरचा भाग वेगळा न झाल्याने बिघाड झाला. अवघ्या तीन तासातच लाईका ला वाढत्या गरमीचा त्रास जाणवू लागला. तिची झालेली तळमळ तिला लावलेल्या सेन्सर मधून जाणवू लागली होती. अखेरीस ५ तास तळमळत असलेली लाईकाच्या सेन्सर मधून काहीच सिग्नल मिळाला नसल्याने तिला मृत घोषित केले.

पुढे हा उपग्रह लाईकच्या अवशेषा सोबत पृथ्वीभोवती १६२ दिवस फिरत राहिला . या कालावधीत त्याने पृथ्वीला जवळपास २५७० फेऱ्या मारल्या होत्या . शेवटी ये उपग्रहही जळून खाक झाल्याचे सांगितले जाते. ११ एप्रिल २००८ साली लाईकाच्या स्मृतीला स्मरून तिला ज्या ठिकाणी ट्रेंनिग देण्यात (मॉस्कोच्या मिलिटरी रिसर्चजवळ) आले होते त्या ठिकाणी स्मारक उभारण्यात आले आहे.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *