लवकरच रविना टंडन बनणार आजी लेकीची बेबी शॉवर फोटो केले शेअर

९० च्या दशकातील आघाडीची नायिका म्हणून रविना टंडन हिने आपली एक वेगळीच छाप रसिकांच्या मनात पाडली होती. परंतु ही अभिनेत्री चक्क आजी बनणार असल्याने सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत येऊ लागली आहे. कारण एवढ्या वयातच ती आजी बनणार असल्याचे समजताच अनेकांपुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. खरं तर रविनाने १९९५ सालीच ११ वर्षाची पूजा आणि ८ वर्षाच्या छाया या दोन मुलींना दत्तक घेतले होते आणि त्यांचा सांभाळ करत होती.

२००४ साली अनिल थडाणी सोबत लग्नाच्या बेडीत अडकल्यानंतर तिला दोन अपत्ये झाली. २०१७ साली तिची मुलगी छाया हिचा विवाह शॉन मेडिस यांच्यासोबत झाला होता. छाया आता आई होणार असल्याने रविना खूप खुश होती. आपल्या लेकीची बेबी शॉवर फोटो तिने सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. तिच्या या बातमीने सगळीकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे तर मीडियामध्ये रविना आजी बनणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या सोहळ्यात रविना तिचा पती अनिल आणि दोन्ही मुलांनी हजेरी लावली होती. रविनाला राशा नावाची मुलगी आणि रणविरवर्धन हे दोन अपत्ये आहेत. त्यांच्यासोबतच तीने पूजा आणि छाया चा सांभाळ केला होता.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *