“लगीर झालं जी ” मालिकेतील या अभिनेत्याचे नुकतेच झाले लग्न… होतोय शुभेच्छांचा वर्षाव …

“लगीर झालं जी ” मालिकेने आजवर अनेक नवोदित कलाकारांना संधी दिली.फौजीच्या जीवनावरील एका वेगळ्या विषयामुळे मालिकेला अल्पावधीतच प्रचंड प्रतिसाद मिळालेला पहायला मिळाला. मालिका प्रक्षेपित होऊन एक वर्ष झाले तरीदेखील आजही खेडोपाडी हि मालिका तितक्याच आत्मीयतेने पहिली जाते. मध्यंतरी मालिकेतील जयडी आणि मामी चे पात्र बदलल्याने मालिकेच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली होती. असो, परंतु मालिकेतील आजवर साकारलेली सर्वच पात्रे प्रेक्षकांनी आपलीशी केलेली पाहायला मिळाली. मालिकेतून एक्झीट घेतल्यांनंतर देखील अनेक कलाकारांनी वेगवेगळ्या माध्यमातून या क्षेत्रात आपला जम बसवलेला पाहायला मिळाला. यातीलच सुरज्याचे पात्र ज्याने साकारले त्याविषयी अधिक जाणून घेऊयात…

मालिकेतील भैय्यासाहेबांचा मित्र म्हणजेच “सुरज्या” चे पात्र सुरज बाबर या अभिनेत्याने साकारलेले पाहायला मिळाले. सुरज बाबर ने साकारलेली हि भूमिका छोटीशी जरी असली तरी प्रेक्षकांच्या ती तितकीच स्मरणात राहिली आहे. वाई ,सातारा येथे वास्तव्यास असलेल्या सुरजने मालोजीराजे विद्यालय तसेच ऍग्री कॉलेज , सातारा येथून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. मालिकेनंतर त्याने इंडिया व्हाया भारत सारख्या वेबसिरीज आणि शॉर्टफिल्म साकारल्या आहेत. आधीची जयडी म्हणजेच किरण ढाणे हिची प्रमुख भूमिका असलेल्या” पळशीची पिटी” चित्रपटालाही तो एक भाग बनला आहे.
सुरजने काही दिवसांपूर्वीच म्हणजे २ डिसेंबर रोजी ” सुदर्शना” हिच्या सोबत लग्नाच्या गाठीत अडकला आहे. यामुळे सुरजवर शुभेच्छांचा वर्षाव पाहायला मिळत आहे. लग्नात सुरजने पिवळसर रंगाचा कोट परिधान केला होता. तर सुदर्शनाने लाल रंगाचा शालू घातला होता. दोघांची जोडी अगदी साजेशी वाटावी अशीच होती. लग्नामध्ये लगीर झाली जी मालिकेतील कलाकारांनी देखील हजेरी लावलेली पाहायला मिळाली.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *