junior lakshmikant berde

आजवर हिंदी मराठी सृष्टीतील सेलिब्रिटींचे त्यांच्याप्रमाणेच दिसणारे अनेक कलाकार तुम्ही पाहिले असतील. अगदी दादा कोंडके, अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, देव आनंद, संजय दत्त यांच्यासारखेच चेहरे असणारे कलाकार वेगवेगळ्या माध्यमातून त्यांची छवी आपल्या कलेतून दाखविण्याचा पुरेपूर प्रयत्न करताना दिसतात. अशाच प्रकारे मराठी सृष्टीतील आपल्या लाडक्या लक्ष्याप्रमाणेच दिसणारा एक अवलिया कलाकार आता प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या डायलॉगवर हा कलाकार नकला करून प्रेक्षकांसमोर येत आहे. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यावरील प्रेमाप्रती या प्रेक्षकांनी त्याच्या व्हिडिओजना जोरदार व्हायरल केलेले पाहायला मिळत आहेत. त्याला अनेकांकडून उत्तम प्रतिसाद देखील मिळत आहे.

DHARMRAJ HOLIYE LAKSHA
DHARMRAJ HOLIYE LAKSHA

त्याच्या या व्हिडीओजची दखल चक्क लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पत्नी “प्रिया बेर्डे” यांनीही घेतलेली पाहायला मिळत आहे. हुबेहुब लक्ष्या साकारणाऱ्या ह्या कलाकाराचे नाव आहे “धरमराज होलीये”. त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेऊयात… हुबेहूब लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासारखे दिसणारे धरमराज होलीये हे शिक्षक असून औरंगाबाद येथे स्थायिक आहेत. त्यांनी साकारलेले अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहेत. त्यांचे हे व्हिडीओ पाहून स्वतः प्रिया बेर्डे यांनी धरमराज यांच्याशी फोनद्वारे संवाद साधला आहे. ‘तुम्ही खूप चांगलं काम करताय, लक्ष्मीकांत बेर्डेनां आजही लोक विसरलेले नाहीत. त्यांच्यावरील प्रेम तुम्ही पुन्हा जागृत करत आहात, धन्यवाद’. असे म्हणून त्यांनी धरमराज यांना भेटण्याचे आश्वासन देखील दिले आहे. प्रिया बेर्डे यांनी दिलेल्या या प्रतिक्रियेमुळे धरमराज पुरते भारावून गेले आहेत. शिवाय प्रिया बेर्डे यांचे आभार देखील मानले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले ज्युनिअर लक्ष्मीकांत बेर्डे आता साऱ्यांचेच मने जिंकून घेताना दिसत असल्याने त्यांच्या फॅनफॉलोअर्सच्या संख्येत देखील दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. धरमराज होलीये यांच्या या निस्सीम कलेला दाद द्यावी तेवढी कमीच , या लेखाच्या माध्यमातून आपणही या अवलिया कलाकाराला अजून थोडीशी प्रसिद्धी मिळवून देऊ…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *