“राहुल गांधींना वोट का द्यायचं” पुस्तकाने सोशल मीडियावर घातली धुमाकूळ.. पुस्तकात जे लिहलंय ते वाचून लोटपोट व्हाल पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा

राहुल गांधी यांच्यावर “Why to vote for Rahul Gandhi? ” नावाचे एक पुस्तक लिहिण्यात आले आहे. सोशल मीडियावर या पुस्तकाची जोरदार चर्चा चालू आहे. अमेझॉनवर तर हे पुस्तक ऑनलाइन खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी झालेली पाहायला मिळत आहे. “शिवम चैधारी” या विद्यार्थ्याने हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात त्याने नेमके काय काय लिहिले आहे याबाबत अनेकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. चला तर मग पुस्तकाबद्दल अधिक जाणून घेऊयात ….

या पुस्तकात सुरुवातीलाच ‘ज्या कोणाला राहुल गांधी देशाचे भावी पंतप्रधान व्हावे अशी ईच्छा आहे त्यांच्यासाठी हे खास पुस्तक लिहिण्यात आले आहे’ असे म्हटले आहे. नुकतंच काही दिवसांपूर्वी ह्या पुस्तकाचं उदघाटन करण्यात आलं. ऑनलाईन हे पुस्तक उपलब्ध असल्याने पुस्तकाचं खप खूप मोठ्या प्रमाणात वाढलाय. पण ह्यात नक्की आहेत तरी काय याची सर्वत्रक चर्चा आहे.
सुरुवातीची एक दोन पाने वगळता अनुक्रमणिकेत भ्रष्टाचार, आर्थिक परिस्थिती, कृषि विषयक बाबी नमूद केल्या आहेत. या अनुक्रमणिका नुसार ‘Take On RSS’ हा पहिला मुद्दा पुढील पानाच्या वरील बाजूस छापण्यात आला आहे. मात् पुस्तकाची बाकी सर्व पाने अक्षरशः कोरी करकरीत आहेत. म्हणजे एकही शब्द पुढे छापण्यात न आल्याने हे पुस्तक चर्चेचा विषय ठरत आहे. यातून पुस्तकाच्या लेखकाला नेमके काय म्हणायचे आहे ते सर्वश्रुत आहे. त्यामुळे हे पुस्तक कोरे जरी असले तरी सोशल मीडियावर ते चर्चेचा विषय ठरत आहे.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *