राहुल्याच्या नव्या “गर्लफ्रेंड” बद्दल बरंच काही… तिचं खरं नाव, कॉलेज आणि स्टायलिश फोटो पाहून आश्चर्य वाटेल

“लागींर झालं जी” मालिकेत सध्या मामी आणि शितलीच्या खेळीची चर्चा रंगली आहे. यादोघींच्या भांडणात मात्र सुट्टीला आलेल्या आज्याची गोची झालेली पाहायला मिळत आहे. यातूनच आता भैय्यासाहेबांनी त्यांच्या मातोश्रीना जयडीबरोबरच्या लग्नाची बोलणी करायला घेऊन येतो आणि कसा डाव टाकतो हे दर्शवले आहे. दुसरीकडे काही प्रमाणात राहुल्या आणि शितलची मैत्रीण सरिता यांच्यातील प्रेमाचे सूर कसे जुळू लागले हेही दर्शविले जात आहे. या सारिताबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात…

खरं तर राहुल्याच्या बाबतीत सांगायचे झाले तर सुरुवातीला मालिकेने कोमल हे पात्र त्याच्या आयुष्यात घातले होते. परंतु या पत्राची मालिकेतून एक्झिट झाली आणि त्याजागी “सारिताची” वर्णी लागली. मालिकेत सरिता नावाचे पात्र “मेघना होशिंग ” हिने साकारले आहे. तिने साकारलेली सरिता सगळ्यांच्याच पसंतीस उतरली. मेघना होशिंग ही मूळची सातारा येथे वास्तव्यास आहे. कन्याशाळा सातारा येथून तीने शालेय पोषण शिक्षण पूर्ण केले. कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अँप्लिकेशन फॉर वूमन, सातारा येथून तिने पदवीचे शिक्षण घेतले.
एसएनडीटी युनिव्हर्सिटी, मुंबई येथून तिने आपले पुढील शिक्षण घेतले. इंटरेस्टिंग इंजिनिअरिंग आणि रोट्रॅक्ट क्लब ऑफ सातारा येथे तिने काम केले आहे. लहानपणापासूनच मेघनाला अभिनयाची आवड निर्माण झाली. कॉलेजमध्ये असताना अनेक नाटकाच्या स्पर्धेत तिने उत्स्फूर्त सहभाग दर्शवला आहे.

२०१७ साली “राजा परांजपे करंडक” , “दादा महाराज करंडक” गाजवून अनेक बक्षिसे मिळवली. ‘हेच माझे खरे धन ‘ असेच ती या बक्षिसांच्या बाबतीत म्हणताना दिसते. अभिनेते सयाजी शिंदे यांच्यासोबत देखील तिला काम करण्याची संधी मिळाली. पहिल्यांदीच अश्या दिग्गज कलाकारांसोबत काम करायला मिळालं त्यामुळे ती खूप खुश होती.
“लागींर झालं जी” ही तीचि पहिलीवहिली मालिका या मालिकेत तिला सारिताची भूमिका साकारण्याची संधी मिळाली तसेच भरपूर प्रसिद्धी मिळाली. राहुल्या हा लागींर झालं जी मालिकेतील प्रसिद्ध कलाकार आणि सर्वांचा आवडता. त्याच बोलणं वागणं मालिकेत धुमाकूळ घालून टाकतं. यापुढेही आणखीन खूप काही साध्य करण्याची तिची ईच्छा तिने व्यक्त केली. लागींर झालं जी ह्या झी वाहिनीच्या मालिकेमुळे तिला आणखीन काम करायला मिळेल यात शंका नाही. मेघना होशिंग हिला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!..

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *