रामायणातील “भरत”ची भूमिका करणाऱ्या ह्या कलाकाराचा मुलगा आहे मराठीतील हा प्रसिद्ध अभिनेता… जाणून आश्चर्य वाटेल

१९८७ साली दूरदर्शनवर “रामायण” ही मालिका प्रसारित होत होती. या अध्यात्मिक मालिकेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतले होते. मालिकेतील राम सीतेच्या भूमिका साकारणारे कलाकार तर रस्त्यावर जिथे दिसतील तिथे लोक त्यांना घेराव घालत एवढेच नाही तर त्यांच्या पाया देखील पडत. प्रेक्षकांच्या मनावर इतका मोठा प्रभाव या मालिकेने घडवून आणला होता. मालिकेत “भरत”ची व्यक्तिरेखा एका मराठी कलाकाराने साकारली होती. या कलाकाराचे नाव आहे “संजय जोग”.

संजय जोग यांनी मराठीतील ‘नवरी मिळे नवऱ्याला’ सारखे काही मोजके चित्रपट साकारले आहेत.तर बॉलिवूडमधील ९० च्या दशकातील जिगरवाला, हमशकल हे चित्रपट साकारले. परंतु त्यांना संपूर्ण भारतात ओळखले ते रामायण मधील त्यांच्या “भरत” च्या भूमिकेमुळे. मूळचे नागपूरचे असलेले संजय जोग यांच्या पत्नी नीता जोग या पेशाने वकील आहेत. वयाच्या अवघ्या चाळिशीतच संजय जोग यांचे आजाराने निधन झाले होते . संजय जोग यांचा मुलगा “रणजित जोग” हा देखील आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत अभिनय क्षेत्रात आला. रणजितने मराठीतील एक होतं पाणी, झिंग प्रेमाची, लपून छपून, ही पोरगी कोणाची सारख्या अनेक चित्रपटात काम केले आहे. त्यासोबतच त्याने हिंदी मालिकेत देखील आपले अस्तित्व दाखवून दिले. “नकळत सारे घडले ” ही मालिका तसेच कलर्स वाहिनीवरील नुकत्याच सुरू झालेल्या ” श्री लक्ष्मी नारायण” मालिकेत त्याने श्वेतसमुद्र देवाची भूमिका साकारली आहे. हॅम्लेट हे गाजलेल्या नाटकात त्याने महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. २९ नोव्हेंबर २०१३ रोजी रणजितचे संयुक्ता भोसले हिच्यासोबत लग्न झाले.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *