राणी ताराबाईंची भूमिका साकारलेल्या मुलीविषयी तुम्हाला हे माहित आहे का?

स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत आता वेगवेगळ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. राजाराम राजेंना औरंगजेबाच्या तावडीत देण्यासाठी जे कटकारस्थान रचले गेले ते हणून पाडण्यासाठी राणी येसूबाई आणि राणी ताराबाईंनी दाखवलेला चाणाक्षपणा, हजरजबाबीपणा या कलाकारांनी आपल्या अभिनयातून चोख दर्शवलेला पाहायला मिळतो आहे. प्रत्यक्षात या व्यक्तिरेखा किती ताकदीच्या असाव्यात हे नकळतपणे आपल्याला जाणीव करून देतात. स्वराज्याची घडी बसवण्यासाठी राणी येसूबाई आणि राणी ताराबाई यांनी दिलेले योगदान तितकेच मोलाचे आणि तितकेच अविस्मरणीय! आजच्या लेखातून राणी ताराबाईंची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराविषयी जाणून घेऊयात…

स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत राणी ताराबाईंची भूमिका साकारली आहे “मृगा बोडस” हिने. मृगा बोडस हिच्या आधी तिची धाकटी बहीण “आभा बोडस” हिनेही याच मालिकेतुन बालपणीच्या ‘येसूबाई’ साकारल्या होत्या. स्टार प्रवाह वरील ‘नकुशी’ या मालिकेतही आभाने बालपणीची नकुशी ही मुख्य भूमिका साकारली होती. डोंबिवली येथील विद्यानिकेतन शाळेत ती शिकत असून आभाला डान्स आणि ऍक्टिंगची विशेष आवड आहे. आभा आणि मृगा या दोघी बहिणींनी ‘वेध ऍक्टिंग अकॅडमीतुन’ अभिनयाचे धडे गिरवले आहेत. या अकॅडमीतून अभिनयाचे धडे गिरवत असलेले बरेच नवखे कलाकार छोट्या पडद्यावर झळकताना दिसतात हीच या अकॅडमीची खासियत आहे. एकपात्री नाटक, नाट्य स्पर्धांमधून या दोघी बहिणींनी अतिशय चमकदार कामगिरी दाखवून अभिनयाची पारितोषिके पटकावली आहेत. मृगाने ‘ओवी’ या गाजलेल्या मराठीतील भयनाट्यात महत्वाची भूमिका बजावली होती. स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतून मृगा बोडस हीचे छोट्या पडद्यावर आगमन झाले. यातून तिने साकारलेली राणी ताराबाई आता साऱ्यांचेच लक्ष वेधून घेताना दिसत आहे. मृगा बोडस हिला राणी ताराबाईंच्या दमदार भूमिकेसाठी खूप खूप शुभेच्छा!!!

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *