राज बब्बरची मुलगी आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री…पहिल्या लग्नातून विभक्त झाल्यानंतर या अभिनेत्यासोबत थाटला दुसरा संसार

बॉलिवूड अभिनेता राज बब्बर सध्या राजकारणात सक्रिय असलेले पाहायला मिळतात. ७० च्या दशकात राज बब्बर यांनी अनेक हिट चित्रपट साकारले. ” किस्सा कुर्सी का ” हा त्यांनी साकारलेला पहिलाच चित्रपट खूप यशस्वी झाला होता त्यातील त्यांच्या भूमिकेचे देखील विशेष कौतुक झाले. हिंदी चित्रपटाव्यतिरिक्त त्यांनी काही बंगाली आणि पंजाबी चित्रपटात काम केले. गेली अनेक वर्षे ते चित्रपट सृष्टीपासून दूर असले तरी राजकारणात ते सक्रिय असलेले पाहायला मिळतात. राज बब्बर यांची मुलगी जुही बब्बर देखील त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत अभिनय क्षेत्राकडे वळली .

२००३ साली “काश आप हमारे होते” हा चित्रपट तिने साकारला होता. काही टीव्ही शो देखील तिने साकारले, त्यानंतर २००७ साली जुहीने दिग्दर्शक बिजॉय नांबियार सोबत पहिले लग्न केले. परंतु २ वर्षांनी त्यांच्या या संसाराला तडा गेला आणि त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. पुढील २ वर्ष तिने एकाकी जीवन व्यतीत केलं पण नंतर ती पुन्हा अभिनयाकडे वळली.
पुढे क्राईम पेट्रोल मध्ये काही एपिसोड हि तिने केले. क्राईम पेट्रोल फेम अनुप सोनी या अभिनेत्यासोबत जुहीने पुन्हा दुसरे लग्न करून आपला संसार थाटला. त्यांना ईमान नावाचा एक मुलगा आहे. सध्या हे कुटुंब नवी मुंबई येथे स्थायिक आहे. जुही बब्बर ह्या आजही अनेक कार्यक्रमांत पाहायला मिळतात. जुही बब्बर हिला तिच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा..

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *