राज ठाकरे ह्यांचे अपार प्रेम होते ह्या बॉलिवूड अभिनेत्रीवर…सोशल मीडियावर रंगून सांगितल्या जात आहेत त्यांच्यातील प्रेमकथा

सोशल मीडियावर कुठलीही गोष्ट व्हायरल व्हायला वेळ लागत नाही. चक्क राज ठाकरे बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या प्रेमात पडले असल्याच्या चर्चाना उधाण आलेले पाहायला मिळत आहेत. ह्यात अनेक प्रसिद्ध वृत्तानीही दुजोरा दिला असल्याचे तुमच्या लक्षात येईल. बॉलिवूडची ही प्रसिद्ध अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून “सोनाली बेंद्रे” असल्याचे सांगण्यात येत आहे. दिलेल्या वृत्तानुसार, राज ठाकरे यांनी सोनाली बेंद्रेला ज्या क्षणी पाहिले त्या क्षणी ते तिच्या प्रेमात आकंठ बुडाले होते.

परंतु त्यांच्या ह्या प्रेमाच्या आड एका व्यक्तीने आडकाठी आणल्याने राज ठाकरे आणि सोनाली बेंद्रे यांचे प्रेम अधुरे राहिल्याचे ह्या वृत्तात म्हटले आहे. ही आडकाठी आणणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून खुद्द बाळासाहेब ठाकरे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. राज ठाकरे ह्यांचे लग्न झाले असल्या कारणामुळे बाळासाहेब ठाकरे यांना त्या दोघांच्या प्रेमाच्या आड यावे लागले होते आणि त्यांच्यामुळेच राज ठाकरे आणि सोनाली बेंद्रे ह्यांचे प्रेम अधुरे राहिल्याचे सांगण्यात आल्याने सोशल मीडियावर ही प्रेमकहाणी पसरताना दिसत आहे.
नोव्हेंबर १९९६ साली मायकल जॅक्सन ज्यावेळी भारतात आला त्यावेळी त्याच्या आगमनावेळी त्याच स्वागत करण्यासाठी राज ठाकरे आणि अभिनेत्री सोनाली बेंद्रे उपस्तित होते. त्यावेळी राज ठाकरे यांनी सोनाली बेंद्रे सोबत काही फोटो काढले आणि ह्या कारणामुळे हे दोघे चर्चेचा विषय बनले. खरं तर ह्या वृत्ताला कुठलाच बुड नसल्याने अशा बातम्या का पसरतात हे न समजण्यासारखे एक कोडंच म्हणावे लागेल. या अशा प्रेमकथा रंगवून सांगितल्याने समोरचा व्यक्ती देखील ह्या बातमीची कुठलीच शहानिशा न करता त्यावर लगेचच विश्वास ठेवतो हे दुर्दैव म्हणावे लागेल.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *