राज ठाकरे यांनी काढलेली काही खास व्यंगचित्रे ..

व्यंगचित्रे पाहायला सर्वानाच आवडतात, त्यातल्यात्यात चालू घडामोडींवरील व्यंगचित्रे तुफान व्हायरल होतात. नुकताच राजठाकरे यांनी फेसबुक आणि ट्विटरवर त्यांनी काढलेली काही व्यंगचित्रे टाकलीत. वाऱ्याच्या वेगाप्रमाणे ती व्हायरल हि झाली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यासह देशभरातील राजकीय घडामोडीवर व्यंगचित्रातून कुंचल्याचे फटकारे मारले आहेत. काल काढलेल्या ताज्या व्यंगचित्राद्वारे राज ठाकरेंनी भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहांवर निशाणा साधला आहे.

न्यायमूर्ती लोया प्रकरण अमित शहांच्या मानगुटीवर भूत म्हणून बसले आहे, असे त्यांना त्यातून सूचवले आहे. सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी व्यक्त केलेल्या शंकेनंतर गाडले गेले न्यायमू्र्ती लोया यांचे प्रकरण उकरले जाणार आहे. त्यातून अमित शहा अडचणीत येणार आहेत, असे राज ठाकरेंनी दाखवले आहे. गाडले गेलेले न्यायमूर्ती लोया मृत्यू प्रकरण सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी व्यक्त केलेल्या शंकेमुळे वर आले, असे या व्यंगचित्रात दाखवण्यात आले आहे. तसेच कबरीतून एक हातही वर आलेला दिसत आहे. तर दुसरीकडे अमित शहांना धूम ठोकताना दाखवण्यात आले आहे. ‘कबरची खबर’ असे या व्यंगचित्राला नाव देण्यात आले आहे.

राज ठाकरे यांनी मागील आठवड्यापासून काही विषयावर भाष्य करत राजकीय-सामाजिक घडामोडीवर फटकारे मारले आहेत. यात हजयात्रेचे दिले जाणारे अनुदान असो, गुजरातमध्ये कोण जिंकल कोण हारलं, शिवसेनेची भाजपला सोडचिठ्ठी तसेच राज्यातील जातीय दलदलीवर भाष्य करताना शिवाजी महाराजांचा आदर्श घेण्याचा सल्ला राज ठाकरेंनी आपल्या व्यंगचित्राद्वारे दिला होता. व्यंगचित्रे पाहायला गमतीचे असले तरी त्यातून बोधघेता येतो.


About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *