राज ठाकरे पुन्हा मोदींवर आक्रमक.. आपल्या खास व्यंगचित्रांच्या शैलीतून हास्यमय पण तितकेच विचार करायला लावणारे चित्र

स्टॅच्यू ऑफ युनिटी एकतेचा पुतळा म्हणून संबोधण्यात आलेल्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नेते वल्लभभाई पटेल यांना समर्पित स्मारक आहे, जे गुजरातच्या राजपिप्ला जवळ नर्मदा धरणाजवळील साधू बेटावर स्थित आहे काल ३१ ऑक्टोबरला हे सर्वांसाठी खुले करण्यात आले. १८२ मीटर (५९७ फूट) उंचीची ही जगातील सर्वात उंच मुर्ती आहे. भारतीय मूर्तिकार राम व्ही. सुतार यांनी ही संरचना (डिझाइन) केले होते आणि पटेलांच्या जयंतीच्या दिवशी ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या स्मारकाचे उद्घाटन केले.

तब्बल २२९० कोटी इतकी अमाप संपत्ती खर्च करून बांधण्यात आलेली हि मूर्ती बनवण्यापेक्षा ह्या रकमेचा वापर जर शेतकरी आणि गरिबांवर झाला असता तर आणखीन बराच काळ बीजेपी सत्तेत राहिली असती, असा टोला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रांच्या माध्यमातून स्पष्ट केले. भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नेते वल्लभभाई पटेल याचा आदर संपूर्ण भारत करतो त्यासाठी दिखाव्याची गरज नाही. जर हाच पैसे गोरगरीब आणि शेतकऱ्यावर खर्च झाला असता तर लोकांनी स्वतःहून देणग्या काढून अशी उंच उंच स्मारके स्वखर्चाने बनवली असती. हा खर्च “वल्लभभाईंना तरी कसा पटेल ” असा सवाल ह्यातून त्यांनी मांडला.
राज ठाकरे यांचं आणखीन एक व्यंगचित्र खूप चर्चेचा विषय ठरला. ह्या व्यंगचित्रात त्यांनी “कापडापासून सूत” असं नाव देऊन लोकांचा कसा गोंधळ उडवला हे दाखवले आहे. त्यांना दिलेली आश्वासने धूळ खात पडल्याचे दिसत आहे.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *