राजा हिंदुस्तानी चित्रपटातील या अभिनेत्याचे झाले निधन बॉलिवूडमध्ये शोककळा

काल शनिवारी बॉलिवूड अभिनेते तसेच प्रसिद्ध कथक नर्तक पंडित विरु कृष्णा यांचे निधन झाल्याची बातमी समजली. त्यांच्या अशा जाण्याने बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. पंडित विरु कृष्णा यांनी राजा हिंदुस्तानी या चित्रपटात भूमिका साकारली होती. यासोबतच त्यांनी ईश्क, हम है राही प्यार के, अकेले हम अकेले तुम अशा चित्रपटांमध्ये अमीर खानसोबत काम केले त्यांच्या या भूमिका विशेष लक्षवेधी ठरल्या होत्या. पंडित विरु कृष्णा हे अभिनेते तर होतेच शिवाय ते उत्कृष्ट कथक विशारद होते त्यांनी कतरिना कैफ, प्रियांका चोप्रा, जुही चावला यांना डान्स शिकवला आहे.

याच आठवणीत प्रियांकाने लहानपणीच्या त्यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांनी मला केवळ कथकच नाही तर अशा खूप काही गोष्टी त्यांनी शिकवल्या ज्यातून प्रेरणा मिळू शकते. तर लारा दत्ता हिने देखील ते असे अचानक गेल्याचे दुःख व्यक्त करत आपल्या भावनाना मोकळी वाट करून दिली. पं विरु कृष्णा यांनी अमीर खान सोबत बरेच चित्रपट साकारले. त्यामुळे निश्चितच त्यांचे बॉलिवूडला दिलेले योगदान खूप मोठे म्हणावे लागेल.
अभिनेता करणवीर बोहरा याने काही दिवसांपूर्वी च त्यांचा फोटो शेअर करून शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या होत्या आणि लगेचच काल या निधनाच्या बातमीने त्याने आपली हळहळ व्यक्त केली. करण नेही त्यांच्याकडेच कथकचे प्रशिक्षण घेतल्याचे नमूद केले होते. खरं तर त्यांच्या निधनाच्या या बातमीने अनेक कलाकारांना अजूनही विश्वास बसत नाहीये पण सत्य स्वीकरावेच लागेल असेही त्यांनी म्हटले आहे.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *