काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी रेखाटलेल्या “भेट आणि मन कि बात” या अमित शहा आणि उद्धव ठाकरे भेटीवर एक चित्र प्रकाशित होत. त्या चित्राच्या विरोधात चित्रात काही बदल करून ते राज ठाकरे यांच्या विरोधात वापरण्याचा प्रयत्न शिवसेने केला होता. आणि त्या चित्राला “सत्तेसाठी मन कि बात” असं टायटल देऊन अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्या ऐवजी राजठाकरे आणि शरद पवार यांची नावे देण्यात आली होती. राजसाहेबांनी आणि त्यात बदल केलेली दोन्हीही चित्रे पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल.

नुकतच राजसाहेबांनी आणखीन एक राजकीय व्यंगचित्र त्यांच्या ऑफिशिअल फेसबुक अकाउंटवर प्रकाशित केलं. त्या व्यंगचित्राला “आयत्या बळावर” असं टायटल होत. त्यात स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन ips अधिकारी बनलेल्याना डावलून, उद्योगपती आणि बाहेरील क्षेत्रातील लोक कसे पुढे जातात ते रेखाटण्यात आलय.. पुढे मोदी आणि अमितशहा त्यांचा सत्कार करण्यासाठी हातात फुलांचा हार घेऊन उभे असताना दिसताहेत. खाली भिडें गुरुजींच्या वक्तव्यावर राजसाहेबांच्या शैलीत टोला हि मारण्यात आलाय.

राजसाहेबांच्या चित्रात पुन्हा एकदा असाच बदल करण्यात आलाय. राजसाहेबांनी रेखाटलेली बरीच व्यंगचित्रे तोडून ,मोडून त्यांच्याच विरोधात परत सोशल मिडीयावर व्हायरल केली जात आहेत. त्यामुळे एखादे यंगचित्र सरकारच्या भूमीकेवर टीका करत असेत तर त्या चित्राला तूम्ही असेच खोडून काढणार का ? आणि अश्या चित्रांचा ऊद्देश तरी काय असावा ? असे अनेक प्रश्न निर्माण होताना दिसतायेत.

व्यंगचित्रांच्या दुनियेतील कलाकार आणि व्यंगचित्रप्रेमी ह्यांनी ह्या खटाटोपाचा चांगलाच समाचार घेऊन निषेध केलेला पाहायला मिळतोय. ह्यावर तुमचं मत काय? कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *