रणवीर सिंगने साजरा केला सिद्धार्थ जाधवचा वाढदिवस .. व्हिडिओ पाहून हसू आवरणार नाही

आपला लाडका सिद्धार्थ जाधव आता ३८ वर्षांचा झालाय गेल्या २३ ऑक्टोबरला सिम्बा च्या सेटवर बॉलीवूड अभिनेत्यांनी अत्यंत उत्साही वातावरणात त्याचा जंगी वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाचा व्हिडिओ नुकताच सिद्धार्थने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला. रणवीरने आपल्या अनोख्या स्टाईल मध्ये डान्स केला तर सिध्दार्थनेही त्याला साथ देत “बार बार दिन ये आये” ह्या गाण्यावर अफलातून साथ दिली. सोशिअल मीडियावर हा विडिओ सध्या चांगलाच धुमाकूळ घालताना पाहायला मिळतोय. ह्या दोघांचा डान्स पाहून रोहित शेट्टी सोबत अभिनेत्री श्री मेहरा यांनाही हसू आवरलं नाही. चला तर मग पाहुयात त्यांचा हा व्हिडिओ जो तुम्हाला पोट धरून हसायला लावेल.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *