येत्या १८ जानेवारी २०१९ रोजी “कृतांत” हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलरही पाहायला मिळाला. ट्रेलरवरूनच चित्रपटातील रहस्य आपल्याला नक्कीच विचार करायला लावतो आहे. त्यामुळे पुढे काय होणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळत आहे. संदीप कुलकर्णी, सुयोग गोऱ्हे, सायली पाटील यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका पाहायला मिळणार आहे. यासोबतच ट्रेलरमध्ये ‘दोन भावांचे गूढ आणि एक युवती यांची कथा ‘ चित्रपटात संदीप कुलकर्णी सांगताना दिसतो. हे सगळे रहस्य या युवतीभोवती दडले असल्याचे दिसून येते. ह्या गूढ युवतीची भूमिका साकारली आहे “वैष्णवी पटवर्धन ” या नवख्या अभिनेत्रीने. तिच्याबद्दल आणखीन जाणून घेऊयात…

वैष्णवी पटवर्धन ही मूळची पुण्याची परंतु कामानिमित्त मुंबईत स्थायिक झाली. एक मॉडेल म्हणूनही तिने काम पाहिले आहे.२०१५ साली ” मिस अर्थ ” ची ती फर्स्ट रनरअप ठरली . याशिवाय २०१६ साली ‘फेमिना मिस इंडिया’ ची फायनलिस्ट बनून टॉप टेन च्या यादीत तिने नाव मिळवले होते. पुढे kkajla हा पंजाबी म्युजीक व्हिडीओ साकारला. “राजा अबरोडिया” या बॉलिवूड चित्रपटात तिला प्रमुख भूमिका साकारण्याची संधी मिळाली. या चित्रपटामुळे वैष्णविला प्रसिद्धी मिळाली. काजल अगरवाल हिच्यासोबत ” हिमालया काजल ” ही जाहिरात तिने साकारली. त्यासोबतच स्ट्रेक्स, गारनिअर हेअर कलर सारख्या जाहिरातीत ति झळकली. माधुरी दीक्षितचा पहिला वहिला मराठी चित्रपट “बकेट लिस्ट” मध्येही वैष्णवी पटवर्धन हिने महत्वाची भूमिका बजावली होती.
रणवीर कपूर गेस्ट असलेल्या भूमीकेत ह्याच चित्रपटात दिसला होता, रणवीर कपूरने केलेला हा त्याचा पहिला मराठी चित्रपट होता ज्यात त्याने आपला छोटासा रोल निभावला. ह्याच चित्रपटात वैष्णवी पटवर्धन आणि रणवीर कपूरची ओळख झाली आणि हा फोटो त्यांनी इंस्टाग्रामवर शेअर केला. आता पुन्हा “कृतांत” या चित्रपटाद्वारे वैष्णवी प्रेक्षकांसमोर येत आहे. चित्रपटातील गूढ तिच्याभोवती गुरफटलेले असल्याने तिच्या अभिनयाची झलक या चित्रपटाद्वारे आपल्याला पुन्हा पाहायला मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *