युवराज सिंहच्या रिटायरमेंट वर वडील आणि तो स्वतः ढसाढसा रडले…पण पत्नीने एक टिपूसही काढला नाही कारण जाणून तुम्हालाही आनंद होईल

टीम इंडियाचा चॅम्पियन ऑलराउंडर युवराज सिंह याने क्रिकेट खेळातून नुकतीच निवृत्ती स्वीकारली आहे. एक पत्रकार परिषद घेऊन त्याने निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले. यावेळी बोलताना भावनिक होऊन त्याच्या डोळ्यातून आपसूकच अश्रू ढळू लागले होते. चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत असताना ‘मी देशासाठी खेळावे’, हे वडिलांनी पाहिलेले स्वप्न मी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला हे त्याने नमूद केले. या खेळाने मला भरपूर काही शिकवले याचीही आठवण करून दिली. आपल्या २५ वर्षाच्या कारकिर्दीत विशेषकरून १७ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय करिअर मध्ये त्याने कितीतरी चढउतार अनुभवले होते.

त्याच्या निवृत्तीबाबत युवराजला स्वतःला अश्रू अनावर झालेले साऱ्यांनी पाहिले, तिथेच त्याच्या वाडीलांच्याही अश्रूंचा बांध फुटला पण युवराजची पत्नी हेजल किच मात्र या सर्वांपासून दूर असलेली पाहायला मिळाली.
लग्नाआधी युवराज आणि हेजलची ओळख झाली. मुळातच हेजलला क्रिकेट खेळाबद्दल फारसे ज्ञान नाही हे समजल्यावर युवराज भोळ्याभाबड्या हेजलच्या प्रेमात पडला. त्यांनतर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. खेळाबद्दल विशेष ज्ञान माहीत नसले तरी हेजलला युवराजचे खूप कौतुक वाटते, तो आहे तसा तिला आवडत असल्याने त्याच्या निवृत्तीच्या निर्णयाचे तिने स्वागत केले आहे. युवराज तिला त्याच्या स्वभावामुळे आवडतो क्रिकेटमुळे मुळीच नाही हे तिने ह्याआधीही सांगितले आहे. युवराजने यापुढेही भारतासाठी आणि भारतीय लोकांसाठी काहीतरी करावं अशीच तिची इच्या आहे आणि याच कारणामुळे तिने त्याच्या निवृत्तीच्या निर्णयावर एक टिपूसही काढला नाही. हेजल सोबत बॉलिवूड सेलिब्रिटींनी देखील ‘तू एक योद्धा आहेस…तू कधीच रिटायर होऊ शकत नाहीस’… अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *