या मराठी अभिनेत्रीच्या पतीचे अगोदरच झाले होते लग्न…जेंव्हा पहिली पत्नी मुलाला घेऊन आली तेंव्हा घडले असे धक्कादायक कि

एक मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री माजी नगरसेवकाच्या प्रेमात पडली होती. अनेकदा शूटिंगच्या ठिकाणी त्याचे जाणे येणे वाढत गेले त्यामुळे त्या अभिनेत्रीला त्याने प्रपोज करून थाटात लग्न उरकले. परंतु लग्नाच्या काही महिन्यांनी या अभिनेत्रीला एक फोन आला आणि जे सत्य समोर आले ते जाणून या अभिनेत्रीला धक्काच बसला. ही अभिनेत्री आहे “स्मिता गोंदकर “. स्मिता गोंदकर ही एक स्टंट रायडर म्हणूनही ओळखली जाते. तसेच अनेक हिंदी म्युजिक व्हिडीओ मध्येही ती झळकली आहे.

मराठीतील काही मोजके चित्रपट देखील तिने साकारले आहेत. मराठी बिग बॉस च्या पहिल्या सिजनमध्ये देखील तिला पाहिले गेले. स्मिता गोंदकर हिची ओळख माजी नगरसेवक सिद्धार्थ बाठिया यांच्यासोबत झाली होती.त्यांची ही ओळख अगदी लग्नापर्यंत येऊन ठेपली होती त्यांचे लग्नही अगदी थाटात पार पडले होते. लग्नानंतर वर्सोवा येथे ती सिद्धार्थ सोबत राहत होती. परंतु अवघ्या तीन महिन्यांनी तिला एका महिलेचा फोन आला आणि मी सिद्धार्थ ची पत्नी आहे आणि आम्हाला दोन मुलं देखील आहेत अशी धक्कादायक माहिती तिने स्मिताला सांगितली. ही बाब तिने सिध्दार्थला विचारली त्यावेळी त्याने अगोदरच पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट घेतल्याचे सांगितले. त्याचे पुरावे देखील त्याने आणून दाखवले त्यावर स्मिताने सिद्धार्थच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. एवढेच नाही तर स्मिताचा विश्वास बसावा म्हणून त्याने स्मितासोबतच्या लग्नाचे सर्टिफिकेट बनवून आणले. यावर विश्वास बसल्याने पूर्वीप्रमाणे स्मिताने आपला संसाराचा गाडा सुरळीत चालवला. कुठल्याही फंक्शनला स्मिता आणि सिद्धार्थ एकत्रित जात त्यामुळे सर्वांनाच तिचे लग्न झाले आहे असे समजले होते.

लग्नाच्या वाढदिवशी देखील त्यांनी अनेकांना आमंत्रित केले होते. त्याचे फोटो वृत्तपत्रात देखील छापले गेले होते. यानंतर काही दिवसांनी एक महिला स्मिताच्या घरी आली त्या महिलेने ‘मी सिध्दार्थची पत्नी असल्याचे सांगितले’. तिचे सर्व बोलणे ऐकून घेतल्यावर स्मिताने घटस्फोट घेतलेल्या कागदपत्रांची चौकशी केली . ते सर्व कागदपत्र खोटे असल्याचे तिच्या निदर्शनास आले.
आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच सिद्धार्थ विरुद्ध तीने तक्रार नोंदवली. ही बाब जेव्हा समोर आली त्यावेळी सिध्दार्थने स्मिता सोबत लग्नच केले नसल्याचा बनाव केला. आम्ही लग्नाचे केवळ शूटिंग करत होते असे धक्कादायक वक्तव्य त्याने त्यावेळी केले होते. हे सर्व ऐकून स्मिता आणखीनच खचून गेली.
मधल्या काळात तिने या सृष्टीपासून दूर राहणे पसंत केले. मानसिक खच्चीकरण झालेली स्मिता आता पुन्हा नव्याने कला क्षेत्राकडे वळालेली पाहायला मिळते.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *