या मराठमोळ्या अभिनेत्रीने दिला “जुळ्या” मुलींना जन्म…

कोंबडी पाळली फेम अभिनेत्री क्रांती रेडकर हिने नुकतेच जुळ्या मुलींना जन्म दिला आहे. त्यामुळे क्रांतीच्या घरच्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे. काही दिवसांपूर्वीच क्रातीने तिच्या फेसबुक वरून डोहाळजेवणाचे फोटो शेअर केले होते. या बातमीने तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव पडताना दिसला. २९ मार्च २०१७ साली तिने आयपीएस अधिकारी समीर वानखेडे सोबत लग्न करून तिच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला. या तिच्या लग्नात अनेक दिग्गज अभिनेत्रींनी हजेरी लावली. पण लग्न आधी तिच्या लग्नाची चाहूलही तिने कोणाला लागू दिली नाही.

त्यामुळे ज्यावेळी लग्नासाठी आमंत्रणे दिली तेंव्हा सर्वाना सुखद धक्का बसला. एका अधिकाऱ्याची पत्नी असल्याचा तिला अभिमान वाटतो. लग्नानंतर तिने खूपच कमी कामे केली. सध्या ती अभिनय सोडून दिग्दर्शनाकडे वळली आहे. इतकच काय तर एका मराठी मालिकेचं दिग्दर्शन करण्यात ती सध्या व्यस्त आहे. मालिका लवकरच छोट्या पडद्यावर प्रदर्शित होणार असून त्याकडे चाहत्यांच लक्ष लागून आहेतिने कथ्थक नृत्याचे प्रशिक्षण घेतले आहे. सून असावी अशी या चित्रपटा द्वारे या क्षेत्रात पाऊल टाकले. यात अंकुश चौधरी तिचा सहकलाकार होता. माझा नवरा तुझी बायको, फुल ३ धमाल, लाडिगोडी, पिपाणी यांसारख्या चित्रपटात तिने काम केले आहे. एक रिऍलिटी शो मध्ये ती परीक्षकाच्या भूमिकेत दिसली. नुकतेच तिने मुंबईच्या सूर्या हॉस्पिटल मध्ये जुळ्या मुलींना जन्म दिला आहे.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *