या बॉलिवूड च्या ६ प्रसिद्ध अभिनेत्री लग्नाआधीच बनल्या प्रेग्नन्ट

बॉलिवूड जगतात प्रसिद्ध अभिनेत्रीचे नाव वेगवेगळ्या चर्चेत गोवले जाते. मग त्यांचे लग्नाआधीच एक दोन अफेअर असो किंवा लग्नानंतरचे वादविवाद ,या सर्वच बाबतीत बॉलिवूड अभिनेत्री कायम चर्चेचा विषय ठरत असतात. पण यातीलच काही बॉलिवूड अभिनेत्री लग्नाआधीच आई बनल्या असल्याच्या बाबी उघड झाल्या आहेत. यामध्ये बऱ्याच प्रसिद्ध अभिनेत्रींचे नाव गोवण्यात आले आहे ….चला तर मग पाहुयात ह्या अभिनेत्री कोण आहेत ज्या लग्नाआधीच प्रेग्नन्ट राहिल्या होत्या.

१. श्रीदेवी- बॉलिवूड मध्ये श्रीदेविने ‘चांदणी ‘ साकारली आणि तिला याच नावाने नवी ओळख मिळाली. अनेक हिट चित्रपट देणारी ही चांदणी लग्नाआधीच प्रेग्नन्ट असल्याच्या बातम्यांना उधाण आले होते. याबाबत स्वतः तिने देखील मीडियाला कबुली दिली होती. २ जून १९९६ रोजी श्रीदेवीने निर्माते बोनी कपूर यांच्यासोबत लग्न केले होते. लग्नाआधीच श्रीदेवी प्रेग्नन्ट होत्या. लग्नानंतर काही महिन्यातच त्यांना कन्यारत्न झालं त्यामुळे या चर्चांना आणखीनच उधाण येऊ लागलेले पाहायला मिळाले होते. २. नेहा धुपिया- नुकतेच नेहा धुपिया ने गोंडस मुलीला जन्म दिल्याच्या बातम्या सोशल मीडियावर पहायला मिळाल्या. नेहाने तिचा बॉयफ्रेंड अंगद बेदी सोबत अगदी गुपचूप लग्न केले होते. मोजक्या मित्रमंडळींच्या साक्षीने त्यांनी हे लग्न उरकले होते. याचे कारणही तसेच होते, यावेळी नेहा तीन महिन्यांची गरोदर असल्याचे बोलले जाते. कारण लग्नाच्या सहा महिन्यातच तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला असल्याने या चर्चांना उधाण आले आहे.

३. अमृता अरोरा- अमृता अरोरा ही मलायका अरोरा खान हिची धाकटी बहीण आहे. अमृताने देखील बहिणीप्रमाणे हिंदी सिने सृष्टीत आपली छवी निर्माण केली होती. ४ मार्च २००२ साली तिने देखील बिजनेसमन शकील सोबत अचानक लग्न केले होते. लग्नाआधीच अमृता आणि शकील यांचे प्रेमसंबंध असल्याचे बोलले जात होते. त्यामुळे याच कारणास्तव त्यांनि लग्नाचा निर्णय घेतला. ४. सेलेना जेटली- अभिनेत्री सेलेना जेटली बॉलिवूड मधील बोल्ड भूमिकेमुळे कायम चर्चेत राहिली होती. अनेक प्रसिद्ध कलाकारांसोबत तिला काम करण्याची संधी मिळाली होती. २३ जुलै २०११ साली तिचा बॉयफ्रेंड पीटर हॉग सोबत लग्न केले होते. लग्नाच्या काही महिन्यांनी लगेचच तिने जुळ्या मुलांना जन्म दिला होता.

५. महिमा चौधरी- परदेस गर्ल म्हणून महिमा चौधरी या बॉलिवूड क्षेत्रात ओळखली जाते. बॉलिवूड चे अनेक हिट चित्रपट देऊन या क्षेत्रात तिने आपला चांगलाच जम बसवला होता. २००६ साली बिजनेसमन बॉबी मुखर्जी सोबत तिने लग्न केले आणि सिने सृष्टीला रामराम ठोकला. लग्नाच्या आधीच महिमा प्रेग्नन्ट असल्याच्या चर्चा झळकत होत्या.लग्नानंतर काही महिन्यातच तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला होता. ६. कोंकना सेन – कोंकना सेन एक दमदार अभिनेत्री म्हणून तिचे नाव घेतले जात होते. बॉलिवूड चे अनेक बोल्ड चित्रपटही तिने साकारलेले पाहायला मिळाले. कोंकना सेन आणि अभिनेता रणबीर शौरी यांचे बरेच दिवस अफेअर चालू होते. ३ डिसेंम्बर २०१० साली त्यांनी लग्न केले आणि काही महिन्यातच म्हणजे १५ मार्च २०११ साली एका मुलाला तिने जन्म दिला. त्यामुळे लग्नाआधीच कोंकना प्रेग्नन्ट असल्याच्या चर्चा रंगल्या. परंतु २०१५ साली दोघेही विभक्त झालेले पाहायला मिळाले होते.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *