या ” दिग्गज अभिनेत्रीला” एका अभिनेत्याने कानाखाली वाजवल्यामुळे गमवावी लागली दृष्टी

ललिता पवार ही एक अशी अभिनेत्री आहे जिने भारतीय सिने सृष्टीत मूक पटापासून ते आधुनिक युगातील चित्रपटात काम केले आहे. १८ एप्रिल १९१६ रोजी ललिता पवार यांचा नाशिक येथे जन्म झाला. त्यांचे खरे नाव अंबा लक्ष्मणराव सगुण असे होते. परंतु ललिताची भूमिका साकारली आणि हेच नाव त्यांनी आत्मसात केले. वडील कापड उद्योगाचे व्यापारी त्यामुळे पुण्याला येण्याचा योग्य आला. वयाच्या अवघ्या ९ व्या वर्षी मूक पटात बालकलाकार म्हणून अभिनयाची संधी मिळाली.तरुण वयात गोड आवाजाची साथ मिळाली आणि मुख्य अभिनेत्री म्हणून अनेक महत्त्वाच्या भूमिका पार पाडल्या.

प्रकाशझोतात असताना वयाच्या २५ व्या वर्षी ललिता पवार यांना पॅरालिसीस झाला आणि त्यांनी दृष्टी गमावली असल्याचे सांगितले जाते परंतु सत्य काही वेगळेच होते… एका चित्रपटाच्या चित्रीकरणात अभिनेते ‘भगवान दादा’ यांना ललिता पवार यांच्या कानाखाली वाजवायची होती, परंतु हा फटका इतका जोरदार लागला की त्यांना आपली दृष्टी गमवावी लागली. १९४२ साली प्रदर्शित झालेल्या “जंग ए आझादी” चित्रपटाच्या एका सिन मध्ये भगवान दादा याना ललिता पवार यांच्या कानाखाली वाजवायची होती. परंतु हा फटका इतका जोरदार होता की ललिता पवार जागीच कोसळल्या आणि त्यांच्या कानातून रक्त येऊ लागले. यानंतर त्यांना ताबडतोब रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. असे सांगितले जाते की चुकीच्या उपचारामुळे डाव्या अंगाला पॅरालिसीसचा अटॅक आला. यानंतर त्यांचा पॅरालिसिस ठीक झाला परंतु डाव्या डोळ्यांची दृष्टी कायमची गमावून बसल्या. यामुळे त्यांचा डावा डोळा आकुंचित पावला आणि याचा परिणाम त्यांच्या कारकीर्दीवर देखील जाणवू लागला. या दुखापतीमुळे जवळपास तीन वर्षे त्या या सृष्टीपासून वंचित राहिल्या. परंतु आपल्यातील कलावन्ताला पुन्हा जागे करत नव्या उमेदीने त्यांनी या क्षेत्रात पाऊल टाकले. यावेळी मात्र त्यांना प्रमुख भूमिकेपासून डावलण्यात आले. अवघ्या एकदोन वर्षाने लहान असलेल्या देव आनंद, राज कपूर, दिलीप कुमार या आघाडीच्या नायकांच्या आईच्या भूमिका त्यांना मिळत गेल्या. असे असले तरी त्यांनी हे आव्हान स्वीकारुन आईच्या आणि पुढे दादिमा च्या भूमिका लीलया पार पाडल्या. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पहिलेच नाही मराठी हिंदी सिने सृष्टीतील खाष्ट सासू, प्रेमळ आजी उदयास आली आणि तब्बल ७०० हुन अधिक चित्रपटात त्यांची वर्णी लागली. १९६१ साली भारत सरकारने ललिता पवार यांना “फर्स्ट लेडी ऑफ इंडियन सिनेमा ” चा मान बहाल केला.
ललिता पवार यांचे लग्न गणपतराव पवार यांच्यासोबत झाले होते. परंतु आपली धाकटी बहीण आणि गणपतराव यांच्यातील जवळकीमुळे त्यांनी गणपतरावांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. पुढे प्रसिद्ध निर्माते राजप्रकाश गुप्ता यांच्यासोबत त्यांनी संसार थाटला. सरते शेवटी वृद्धपकाळात पुण्यातील औंध येथे २४ फेब्रुवारी१९९८ साली वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *