सोशिअल मीडियावर तुम्हाला तुमच्या आवडत्या कलाकारांचे फोटो पाहायला मिळतात त्यांची माहितीही पाहायला मिळते. पण ती माहिती खरी आहे कि नाही याची आपण पडताळणी करत नाही. यू ट्यूब च्यायनवर तर बरीच खोटी माहिती पाहायला मिळते याच अभिनेत्रींचे खरी माहिती आणि शिक्षण काय आहे ते जाणून घेऊयात.
धनश्री कडगावकर- “तुझ्यात जीव रंगला” मालिकेत नंदिता ची भूमिका साकारून धनश्री काडगावकर घराघरात पोहोचली. या मालिकेमुळे धनश्रीला भरपूर प्रसिद्धी मिळाली. पुण्यातील बीएमसीसी कॉलेजमधून तिने मास्टर इन मॅनेजमेंट ची पदवी प्राप्त केली आहे. गंध फुलांचा गेला सांगून, जन्मगाठ, माझिया प्रियाला प्रिंत कळेना यासारख्या मालिका आणि महाराष्ट्राचा सुपरस्टार मधून धनश्रीने पार्टीसिपेट केले होते. कट्यार काळजात घुसली, आधी बसू मग बोलू या नाटकातदेखील तिने काम केले आहे.


अक्षया देवधर- “तुझ्यात जीव रंगला” मालिकेत पाठकबाईंची भूमिका साकारून अक्षया देवधर प्रसिद्धीच्या झोतात आली. पुण्यातील ‘नाटक कंपनी’ चा ती एक भाग बनली आणि अनेक प्रायोगिक नाटक तिने साकारली. पुण्यातील अहिल्यादेवी हायस्कुल मधून शालेय शिक्षण तर बीएमसीसी कॉलेजमधून तिने मासमीडिया ची पदवी प्राप्त केली आहे. २०१२ साली मटा तर्फे तिने “श्रावण क्वीन “चा पुरस्कार देखील पटकावला आहे. बिन कामाचे संवाद, संगीत मानापमान या नाटकाचा देखील ती एक भाग बनली.

प्राजक्ता माळी- “जुळून येती रेशीम गाठी ” ,”नकटीच्या लग्नाला यायचं हं” या झी वाहिनीच्या मालिका तिने साकारल्या. प्राजक्ता भरतनाट्यम विशारद देखील आहे. वयाच्या सातव्या वर्षांपासून तिने नृत्याचे धडे गिरवले आहेत. अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयातुन तसेच ललित कला केंद्र येथून मास्टर ची डिग्री प्राप्त केली आहे. युनिव्हर्सिटी टॉपर म्हणूनही ती ओळखली जाते. इयत्ता सहावीत शिकत असताना तिने सह्याद्री वाहिनीवरील “ढोलकीच्या तालावर ” शोमध्ये पार्टीसिपेट केले होते. यासोबत अनेक रंगमंचावर तिने आपल्या नृत्याची कला सादर केली आहे. संघर्ष, खो- खो, गोळाबेरीज, मणिकर्णीका सारख्या चित्रपटात तिला उत्तम भूमिका मिळाल्या.

अनिता दाते- अनिता दाते ही मूळची नाशिक जिल्हयात जन्मली त्यामुळे एम आर शारदा कन्या विद्यामंदिर मधून तिने शालेय शिक्षण घेतले. पुढे अभिनयाची आवड निर्माण झाली आणि पुण्यातील ललित कला केंद्र मधून मास्टर ची डिग्री मिळवली. तिचे काका उपेंद्र दाते हेदेखील नाटक क्षेत्रातच कार्यरत आहेत.अग्निहोत्र, अनामिक, मंथन, एका लग्नाची तिसरी गोष्ट या मालिकेत तिने भूमिका साकारलेली पाहायला मिळाली. जोगवा, पोपट, आजोबा, कॉफी आणि बरंच काही सारखे चित्रपट तिने साकारले . बंदिनी, बालविर सारख्या हिंदी मालिकाही तिने साकारल्या. सागर कारंडे सोबत “जस्ट हलकं फुलक” हे नाटकही तिने साकारले.

सायली संजीव- “काहे दिया परदेस” मधून तिने गौरी साकारली. शिव आणि गौरी च्या या जोडीलाही प्रेक्षकांनी विशेष दाद दिलेली पाहायला मिळाली. धुळे जिल्ह्यातील एच पी टी कॉलेज मधून तिने पोलिटिकल सायन्स चे पदवीचे शिक्षण घेतले आहे. सातारचा सलमान, आटपाडी नाईट्स, पोलीस लाईन्स सारख्या चित्रपटाचा ती एक भाग बनली. लांडगा- मोर हे नाटकही तिने साकारले. नुकतीच तिने “परफेक्ट पती” ही हिंदी मालिका साकारली आहे. त्यात तिने ‘विधिता’ ची भूमिका साकारली आहे. तिच्या या मालिकेलाही प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.


रसिका सुनील- “शनयाची” विरोधी भूमिका साकारून सुद्धा रसिका सुनीलच्या या भूमिकेला प्रेक्षकांकडून चांगली पसंती मिळाली होती. त्यामुळे तिला आजही “शनया” म्हणूनच ओळखले जाते. माझ्या नवऱ्याची बायको मालिकेत आता ही भूमिका बानू म्हणजेच अभिनेत्री ईशा केसकर साकारताना दिसत आहे.
रसिका ही एक उत्कृष्ट गायिका देखील आहे. अजय अतुल सोबत तिने अनेक रंगमंचावर लाईव्ह परफॉर्मन्स दिले आहेत. शास्त्रीय संगीताच्या शिक्षणासोबत तिने बेडेकर कॉलेजमधून मासमीडिया चे शिक्षण घेतले आहे. बस स्टॉप, कल्ला हे चित्रपटही तिने साकारले आहेत. अभिनेत्री आदिती द्रविड सोबत तिने ” यु अँड मी ” हा म्युजीक अल्बम देखील साकारला आहे. गॅट- मॅट हा तिचा आगामी चित्रपट देखील लवकरच प्रदर्शित होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *