yashwant banhatti photo

माझ्या नवऱ्याची बायको मालिकेत सौमित्रच्या वडिलांची भूमिका साकारली आहे अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक “गौतम जोगळेकर” यांनी. सुरक्षेच्या कारणास्तव काही दिवस मालिकेत मोजक्याच कलाकारांना काम करण्याची संधी मिळत होती. परंतु हळूहळू या मालिकेत अगोदरच्याच अनेक कलाकारांना आता पुन्हा एकदा झळकण्याची संधी मिळत आहेत. गौतम जोगळेकर हे लेखक, दिग्दर्शक असूनही बॉलिवूड चित्रपटातून नायक म्हणून समोर आले होते आज यांच्या कुटुंबातील सदस्यांबद्दल आणखीन जाणून घेऊयात…

arun joglekar
arun joglekar

गौतम जोगळेकर यांनी १९९१ सालच्या नाना पाटेकर दिग्दर्शित “प्रहार” या बॉलिवूड चित्रपटात काम केले होते. ज्यात माधुरी दीक्षित, नाना पाटेकर, डिंपल कपाडिया प्रमुख भूमिकेत झळकले होते. मराठी चित्रपट पक पक पकाक, आई नं १, जय जय महाराष्ट्र माझा यांचे दिग्दर्शन गौतम जोगळेकर यांनी केले होते. कलर्स मराठीवरील अस्सं सासर सुरेख बाई, राधा प्रेमरंगी रंगली या मालिकेतून ते छोट्या पडद्यावर देखील झळकले आहेत. गौतम जोगळेकर हे मराठी-हिंदी सृष्टीतील दिग्दर्शीका आणि लेखिका “सई परांजपे” यांचा मुलगा आहे. सई परांजपे यांनी अनेक अवॉर्ड विनिंग चित्रपट या सृष्टीला दिले आहेत. त्यांच्या भरीव योगदानाबद्दल त्यांना पद्मभूषण पुरस्काराने देखील गौरविण्यात आले होते. “अरुण जोगळेकर” यांच्यासोबत त्या विवाहबंधनात अडकल्या परंतु काही कारणास्तव त्या विभक्तदेखील झाल्या. अरुण जोगळेकर हे थेटर आर्टिस्ट म्हणून ओळखले जात. १९९२ साली अरुण जोगळेकर यांचे निधन झाले वेगळे झाल्यानंतरही त्यांची मैत्री टिकून होती. वेगळे झाल्यानंतरही अरुण जोगळेकर यांनी सई परांजपे यांच्या ‘स्पर्श’, ‘कथा’ यासारख्या चित्रपटात काम केले होते.

wini paranjpe joglekar
wini paranjpe joglekar

सई परांजपे यांच्या आई ‘शकुंतला परांजपे’ या हिंदी- मराठी चित्रपट अभिनेत्री म्हणून ओळखल्या जात. ३० ते ५० च्या दशकातील स्री, दुनिया ना माने, लोकशाहीर राम जोशी,भक्त प्रल्हाद, पैसा, कुंकू, बहादूर बेटी सारखे अनेक चित्रपट त्यांनी साकारले होते. यासोबतच त्या लेखिका आणि सामाजीक कार्यकर्त्यादेखील होत्या. सई परांजपे आणि अरुण जोगळेकर यांना “गौतम” आणि “विनी” ही दोन अपत्ये . “विनी परांजपे” या ८० च्या दशकातील बॉलिवुड अभिनेत्री म्हणूनही ओळखल्या जात. विनी यांचे अभय यांच्याशी लग्न झाले त्यांना ‘अबीर आणि अंशुनी’ ही दोन अपत्ये आहेत. विनी परांजपे या मोनॅकोच्या जाहिरातीमध्येही झळकल्या होत्या. सई परांजपे यांच्या नाटक, चित्रपटातूनही त्यांना अभिनयाची संधी मिळाली. पपिहा, कथा, रैन बसेरा, टेहनी एक गुलाब की, सिकंदर, चष्मे बद्दूर, हम पंछि एक चाल के, चकाचक यासारख्या टीव्ही मालिका तसेच चित्रपट त्यांनी अभिनित केले आहेत. पपिहा चित्रपटातील मिलिंद गुणाजी यांच्यासोबतचे त्यांचे ‘बोले पपिहा..’ हे गाणं देखील खूप गाजलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *