मोहरा चित्रपटातील साधीसुधी दिसणारी “ही” अभिनेत्री आता दिसते इतकी स्टायलिश…पाहून आश्चर्य वाटेल…

“ना कजरे की धार ना मोतीयों का हार” हे मोहरा चित्रपटातील गीत आजही गुणगुणले जाते. चित्रपटात सुनील शेट्टी, रविना टंडन, अक्षय कुमार ,नसिरुद्दीन शहा यांच्या महत्वाच्या भूमिका पाहायला मिळाल्या. यांच्यासोबतच आणखीन एक चेहरा समोर आला तो म्हणजे “पूनम झावरा” या अभिनेत्रीचा. पूनम झावरा ही एक अभिनेत्री, गायिका, मॉडेल म्हणूनही या सृष्टीत वावरली आहे. मूळची राजस्थान येथील असलेल्या पूनमचे बालपण आणि शिक्षण मुंबईतच झाले. वडील व्यावसायिक आणि आई उत्कृष्ट लेखिका तसेच गायिका. अनेक कार्यक्रमात त्यांनी आपली कला सादर केली आहे. त्यामुळे साहजिकच पूनमला या चंदेरी दुनियेचे वेड लागले आणि मॉडेलिंग कडे पाऊल वळले.

सुरुवातीला जाहिरात क्षेत्रातील डव्ह साबण, पाणेरी साडी या ब्रॅण्डसाठी काम केले. मोहरा हा तिने साकारलेला पाहीलाच सिनेमा आणि या भूमिकेमुळे ती प्रकाशझोतात आली. मोहरा चित्रपटात तिने सुनील शेट्टी च्या पत्नीची भुमिका निभावली होती. या चित्रपटानंतर तिने काही दाक्षिणात्य आणि बॉलिवूड चित्रपटासोबतच “संसाराची माया ” हा एक मराठी चित्रपटही साकारला आहे. एवढेच नाही तर तिने काही म्युजीक अल्बम सोबत २००३ सालच्या आंच चित्रपटात निर्माती, अभिनेत्री आणि गायिका यांच्या भूमिका निभावल्या आहेत.
काही काळ या क्षेत्रापासून बाजूला जात पुन्हा अक्षय कुमारच्या OMG ओह माय गॉड चित्रपटात ती राधेमा च्या भूमिकेत दिसली.बऱ्याचवेळा ती सामाजिक कार्यात वूमन्स ग्रुप आणि NGO साठी देखील ती कार्य निभावताना दिसते .तिच्या आताच्या लूकवरून हीच का ती मोहरा चित्रपटातील साधीसुधी अभिनेत्री असा प्रश्न अनेकांना पडत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर पुनमची चर्चा रंगली आहे.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *