मोहन जोशी अभिनेते म्हणून काम करण्याआधी करायचे हे काम.. वाचून आचार्य वाटेल. फॅमिली फोटोसह नक्की पहा

मराठी नाटक, टीव्ही मालिका तसेच सिने सृष्टी आशा सर्वच क्षेत्रात उत्तम कामगिरी करून आजतागायत केवळ अभिनयाच्या जोरावर आपला पाया घट्ट रोवून ते उभे आहेत. राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना “संगीत नाटक अकादमी अवॉर्ड” ने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी केवळ मराठी सिने क्षेत्रातच नव्हे तर बॉलिवूड, भोजपुरी तसेच दाक्षिणात्य चित्रपटातही उत्तम कामगिरी केली आहे. एक दिग्गज अभिनेता म्हणून मोहन जोशींकडे पहिले जाते. मोहन जोशीं सोबत काम करायची संधी मिळावी असे अनेक नवोदित कलाकारांचे स्वप्नं असत.

मोहन जोशी यांचा १२ जुलै १९५३ साली बंगलोर येथील एका मराठी कुटुंबात जन्म झाला.नंतर बालपण आणि सर्व शिक्षण त्यांचे पुण्यातच झाले.शिक्षणासोबतच त्यांना अभिनयाची देखील आवड असल्याने अनेक नाटकांमध्ये सहभाग दर्शवला. ही आवड जोपासत असताना त्यांनी काही काळ नोकरीही केली. घरखर्चाला हातभार लागावा यासाठी पुण्यातील “किर्लोस्कर” कंपनीत त्यांनी नोकरी पत्करली होती.

पण नाटक आणि नोकरी दोन्हीला वेळ देता येत नसल्याने अखेरीस नोकरीला रामराम ठोकला आणि आपला संपूर्ण वेळ त्यांनी या क्षेत्रासाठी दिला. नाटकांमधून मिळणारे मानधन कमी पडू लागल्याने आपला स्वतःचा ट्रक चालवण्यास सुरुवात केली. तब्ब्ल आठ वर्षे ड्रायव्हर म्हणून त्यांनी काम केले.

” कुर्यात सदा टिंगलम” हे त्याचे पहिलेच व्यावसायिक नाटक तुफान गाजले होते. त्यानंतर गाढवाचं लग्न, तरुण तुर्क , एकदा पाहावं करून अशा बऱ्याच नाटकांमधील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांसमोर सादर केल्या. सुरुवातीच्या काळात त्यांनी अनेक खलनायकाच्या भूमिका साकारल्या आहेत. एक गाडी बाकी अनाडी, रंग माझा वेगळा, फुगे, एक डाव भुताचा, देऊळ बंद या चित्रपटात त्यांनी काम केले. ‘घराबाहेर’ आणि ‘सवत माझी लाडकी’ मधील अभिनयासाठी महाराष्ट्र सरकारचा अभिनय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर ‘गुंडा पुरुष देव’मधील उत्कृष्ट अभिनयासाठी मटा सन्मान देण्यात आला.

चित्रपटासोबतच छोट्या पडद्यावरील अनेक टीव्ही मालिकेतील त्यांच्या भूमिका उल्लेखनीय ठरल्या. ” काहे दिया परदेस ” मधील गौरीचे बाबा त्यांनी उत्तम साकारले.”नटखट” या पुस्तकाचे लेखनही त्यांनी केले आहे. मोहन जोशी यांच्या पत्नीचे नाव ज्योती जोशी . दोघांनी मिळून ” गौरीनंदन थेटर्स ” ची निर्मिती केली आहे. त्यांना एक नंदन नावाचा मुलगा आहे. नंदन इंटेरिअर डिझायनर म्हणून आपल्या क्षेत्रात कार्यरत आहे. सध्या मोहंजोशी सहकुटुंब नवी मुंबई येथे स्थायिक आहेत.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *