मोबाईल मध्ये कैद झालं नाहीतर कोणालाही विश्वास बसला नसता

महेंद्रसिंग धोनी एक चाणाक्ष कर्णधार म्हणून त्याची किर्ती सर्वत्र पसरलेली आहे. विकेटमागे उभा राहत तो ज्या काही रणनिती वापरतो, त्याचा कुणालाही अंदाज लागत नाही. आपल्या रणनीतीच्या जोरावर तो प्रतिस्पर्धी फलंदाजांना आपल्या चक्रव्यूहात फसवताना साऱ्यांनीच पाहिले आहे. भारत आणि बांगलादेश यांचा सामनाही तुम्ही पहिला असेल. जेंव्हा ३ चेंडूमध्ये २ धावांची गरज होती. आठवला तो दिवस .. अहो आठवणाराच पण तुम्ही तो क्षण टीव्ही वर पहिला असेल त्यादिवशी शेवटच्या चेंडूवर काय घडलं.. धोनीने काय केलं ते पाहुयात..

बांगलादेशला जिंकण्यासाठी ६ बॉल मध्ये १० धावांची आवशकता होती. शेवटची ओव्हर हार्दिक पंड्याची होती. दोन चेंडूंतच २ चौकार गेले आणि आता जिंकण्यासाठी ३ बॉल मध्ये २ धावांची गरज होती. पण बांग्लादेशच्या सलग २ चेंडूत २ विकेट्स गेल्या आणि शेवटच्या चेंडूवर २ धावांची गरज होती. आता हा व्हिडिओ पहा.. ह्यात तुम्हाला दिसेल कि धोनी बॅट्समनच्या मागील दोन्ही बाजूस दोन खेळाडू बाउंडरी अडवण्यासाठी लावतो. शिवाय त्या दोघांनाही थ्रो कसा करायचा हेही सांगतो. इतकाच नव्हे तर तो स्वतःही चेंडू स्टॅम्पवर कसा मारायचा याचे प्रात्येक्षिक करतो. यावरून धोनी किती दूर दृष्टीचा आणि चालाक आहे याचा अंदाज येतो. तो फक्त अंदाज घेत नाही तर तशी कृती व्हावी यासाठी मेहनतही करतो.(धोनीला इतका विश्वास होता कि हा चेंडू बॅट्समनने मारला तरी तो स्टंपच्या मागील बाजूलाच येणार.. हाच तर आहे कूल कॅप्टन धोनीचा अंदाज)

धोनीची फलंदाजीची शैली साऱ्यांनाच माहिती आहे. तो फलंदाजीला आल्यावर पहिले काही चेंडू ढकलत खेळतो. एक पाय पुढे काढून चेंडू बॅटवर घेतो आणि जिथे जागा दिसेल तिथे चेंडू ढकलतो. धोनीला स्थिरस्थावर व्हायला 15-20 चेंडू लागतात, त्यानंतर मात्र धोनी मोठे फटके लगावतो. तो कूल आहे .. होय तो खरंच कूल आहे कारण त्याला स्वतःवर जितका विश्वास आहे तितकाच समोरच्याच्या रणनीतीवर. त्यामुळेच तो जगातला सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि कॅप्टन ठरला आहे.

बांगलादेशला शेवटच्या बॉलला २ रन हवे असताना धोनीने रन आऊट केलेलं तुम्ही पाहिलं असेल परंतु त्यापूर्वी हे घडलेलं टीव्हीवर दाखवलं नाही ते ह्या मोबाईल मध्ये कैद झालं नाहीतर कोणालाही विश्वास बसला नसता..

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *