मोबाईलमध्ये लुडो खेळणाऱ्यानो सावधान.. होऊ शकतो ३ महिन्यांचा कारावास आणि भरावा लागेल २००० रुपायांचा दंड

इंटरनेट वर ऑनलाईन गेम खेळणाऱ्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. काही वर्षांपूर्वी भारतीय लोक ऑनलाईन ३ पत्ते खेळण्यासाठी वेडे झालेले पाहायला मिळाले. ऑनलाइन गेमच हे खूप इतकं वाढलं कि भाजी विक्रेत्यांपासून ऑफिसमध्ये इतकलाच काय तर घरातील महिलाही ३ पत्ती खेळताना दिसायच्या. ३ पत्ती नंतर रम्मी हा ओंलीने खेळ आला, त्यातही लोकांनी आपली पसंती दर्शवत ह्या खेळाला आपला अमूल्य वेळ दिला. पण सध्या लुडो खेळणाऱ्यांची संख्या खूप वाढलीय.

लोक लुडो खेळताना २०, २५, ५० ,१०० अश्या रुपयांचे डाव लावताना पाहायला मिळतात. शासनाने याची दाखल घेत हा खेळ आता पैश्याने खेळणाऱ्या व्यक्तीविरोधात कारवाई करायला सुरु केली आहे. ज्या प्रमाणे पत्ते खेळणं हे अनधिकृत आहे त्याच प्रमाणे पैशाने लुडो खेळणेही आता अनधिकृत मानले जाते. नुकताच मुंबईत अश्या प्रकारे लुडो खेळणाऱ्या ४ मुलांना पोलिसांनी रंगे हाथ पकडून गजाआड केल्याची घटना घडलीय. जर अश्या प्रकारे पैश्याने लुडो खेळात असाल तर ३ महिन्यांचा कारावास आणि २००० रुपयांचा दंड भरावा लागत असल्याचे समोर आले आहे.
ऑनलाईन खेळ खेळण्यासाठी वत्याही प्रकारचे बंधन नाही पण त्याचा गैरवापर करून तुम्ही सट्टा खेळात असाल तर तुम्हाला ते आता खूप महागात पडण्याची शक्यता आहे. अश्या खेळांमुळे आपण आपला अमूल्य वेळ वाया घालवतो, फावल्या वेळात होणारी कामे आपण पुढे ढकलतो आणि ह्या सारख्या ऑनलाईन खेळणं प्राधान्य देतो. नुकसान आपलेच आहे पैसे कधीही कमावता येतात पण निघून गेलेली वेळ पुन्हा येत नाही एवढे मात्र खरे…

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *