“मुळशी पॅटर्न” चित्रपटातील या सुंदर अभिनेत्रीची सगळीकडे होत आहे चर्चा…शेतकऱ्यांसाठी करतेय मोलाचं कार्य

अभिनेता दिग्दर्शक प्रवीण तरडे “मुळशी पॅटर्न” चित्रपट प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहे. नावाप्रमाणेच चित्रपटाचे कथानकहि तितकेच रंजक वाटावे असेच आहे. मध्यंतरी प्रवीण तरडे वर चित्रित झालेल्या याच चित्रपटातील ‘अरारारा खतरनाक’ गण्याचीही बरीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती. चित्रपटाचा टिझररही नुकताच प्रदर्शित झालेला पाहायला मिळाला. अभिनेता ओम भूतकर, प्रवीण तरडे, महेश मांजरेकर यांची भूमिकाही तितकीच दमदार असल्याचे टिझर वरून लक्षात येते.

चित्रपटात महेश मांजरेकर यांच्या मुलीच्या भूमिकेत “मालविका गायकवाड” हा नवखा चेहरा प्रथमच पाहायला मिळत आहे. येत्या काळातील ‘स्टार अभिनेत्री’ म्हणून मालविका सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत येऊ लागली आहे. देखण्या चेहऱ्यासोबत मालविका शालेय जीवनात हुशार मुलगी म्हणून ओळखली जाते. एवढेच नव्हे तर मालविकाने सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधून बी ई इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीची पदवी प्राप्त केली आहे. पुढे ACI Worldwide मध्ये तिने काही काळ नोकरी पत्करली . “द ऑरगॅनिक कार्बन ” ची फाऊंडर म्हणूनही आता ती कार्यभर सांभाळत आहे. २०१५ सालापासून ती शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती विषयीचे मार्गदर्शन करण्याचे कार्य ती पार पाडत आहे.
मालविकाला तिच्या “मुळशी पॅटर्न” या पहिल्यावहिल्या चित्रपटासाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा!…

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *