मुंबईतील प्रसिद्ध ” झुंबा फिटनेस” सेंटर मध्ये फिटनेस ट्रेनर म्हणून कार्यरत आहे या मराठमोळ्या सुंदर अभिनेत्रीचा नवरा..

मुंबईत ” झुंबा फिटनेस सेंटर ” एक नावाजलेले नाव आहे. याच सेंटरमध्ये फिटनेस ट्रेनर म्हणून सागर मोरे कार्यरत आहे. विले पार्ले मधील साठे कॉलेजमधून त्याने आपले शिक्षण पूर्ण केले. सागर मोरे याने अभिनेत्री शर्वरी लोहकरे हिच्यासोबत १९ नोव्हेंबर २०१२ साली लग्न केले आहे. शर्वरीला तुम्ही ” या सुखांनो या ” या झी वाहिनीच्या प्रसिद्ध मालिकेत पाहिले असेल. यात तिने “कस्तुरीची” भूमिका साकारली होती. प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या नारकर तिच्या मोठया जावेच्या भूमिकेत दिसल्या.

शर्वरी लोहकरे मूळची पुण्यात वाढलेली मुलगी. पुण्यातील अभिनव विद्यालयातून तिने शालेय शिक्षण पूर्ण केले. तर बी एम सी सी महाविद्यालयातुन तिने बी कॉम ची पदवी मिळवली आहे. अभिनेत्री शुभांगी दामले या तिच्या नातलग आहेत. लहानपणापासून च त्यांची नाटके, चित्रपट पाहून अभिनयाची आवड तिच्यात निर्माण झाली.

सह्याद्री वाहिनीवरील “यंग तरंग” या मालिकेचे सूत्रसंचालन म्हणून तिने काम पाहिले आहे. तसेच “लज्जतदार” या कुकरी शोचे अनेक एपिसोड तिने साकारले आहेत. तीन पायांची शर्यत, डिसीजन, तसेच राहुल मेहेंदळे, लोकेश गुप्ते यांसोबत “शू sss कुठे बोलायचं नाही ” या नाटकात भूमिका सादर केल्या आहेत.

लग्नाआधी शर्वरी आणि सागर मुंबईत एकाच बिल्डिंग मध्ये राहत होते .त्यामुळे दोघांची ओळख निर्माण झाली. दोघांचीही जात वेगळी असल्याने घरचे विरोध करतील असे त्यांना वाटत होते. पुढे घरच्यांच्या संमतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला. अखेरीस १९ नोव्हेंबर २०१२ रोजी पुण्यातच लग्न केले.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *