नमस्कार मित्रानो, मी स्वाती काल घडलेला प्रसंग सांगू इच्छिते.. मी पुण्याच्या इन्फोसिस आयटी कंपनीत गेल्या ६-७ महिन्यांपासून काम करते. नुकतंच कॉलेज संपलं आणि नोकरी मिळाली यामुळे मी खूप खुश झाले, घरच्यांनाही खूप आनंद झाला. कंपनीला शनिवार, रविवार सुट्टी असते. रविवारी आम्ही काही मैत्रिणी सिंहगडावर बाईकनी गेलो खूप छान वाटलं. “स्वराज रक्षक संभाजी” मालिका मी नेहमी पाहते माझ्या घरी आणि मैत्रिणीही हि मालिका पाहतात. उत्तम मालिका आहे ह्या मालिकेचाच प्रभाव असेल कदाचित जो आम्हाला सिंहगडावर घेऊन गेला. सुंदर वातावरण आणि तेथील सुखसोई तसेच गडावरील ताक, दही झुणकाभाकर आणि भजी यांवर सर्वानीच ताव टाकला. पिठलं भाकर म्हटलं कि नको म्हणून नाक मुरडणाऱ्या आम्ही मुली त्यावर तुटून पडलो. दुपारझाली महाराज्यांचा दर्शन घेतलं आणि घरी निघालो.

घरी जाताना मैत्रिणीच्या डोक्यात चित्रपट पाहायचं खुळ शिरलं. मग चिंचवडला पोचताना रस्त्यात थांबून मोबाईलवर चित्रपट कोणते कोणते पाहत ते पाहू लागलो. एक मराठी चित्रपट ज्यावर खूप चांगल्या कमेंट आणि जवळपास ८५% लोकांनी लाईक केलेला “बॉईज-२” चित्रपट पाहायचं ठरलं. चित्रपटाला ए ग्रेड असल्याने चित्रपटात काही विचित्र भाषा आणि सीन असणार हे समजलं, चित्रपटाचा ट्रेलर पहिला. ठीक आहे काही हरकत नाही म्हणून चित्रपटाचं तिकीट काढलं. अनेक मुली मूल तसेच काही महिलाही हा चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या पाहून मनाला समाधान भेटलं.
चित्रपट सुरु होण्यापूर्वी राष्ट्रगीत झालं आणि जमलेल्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराज कि जय असं हि म्हटलं त्यांना सवानाच दाद दिली आणि महाराजांच्या आवाजाने पुन्हा एकदा थिएटर दणाणलं. चित्रपट सुरु झाला नावं वाचली अवधूत गुप्ते सारख्या फेमस अभिनेत्याचा चा सिनेमा त्यामुळे चित्रपट चांगलाच असेल असं वाटलं. चित्रपट सुरु झाला, पहिल्या मिंटापासून चित्रपटात अतिशय घाणेरडी भाषा आणि इशारे करण्यात आलेले पाहायला मिळाले. इतकी घाणेरडी भाषा आणि तेही मराठीतले इतके मोठे कलाकार चित्रपटात असताना? तुम्ही चित्रपट पहिला कि नाही मला माहित नाही पण चित्रपट खूपच खालच्या दर्जाचा आहे. अगदी इज्जत आणि अब्रूचे दिवाळे निघावेत ह्याहुनही भयंकर. मध्यंतरापर्यंत चित्रपट कसाबसा पहिला आणि पुढे चित्रपट पाहायची इच्छाच उरली नाही. पूर्ण एसी असलेल्या सिनेमागृहात शरमेने घाम फुटावा इतकं घाणेरडं होत हे. चित्रपटात निर्मात्याला काय दाखवायचं हे काहीच समजत नव्हतं. हवीहवीशी गावठी भाषा यांचा चुराडा पाहायला मिळाला. चित्रपट पाहताना मान शरमेनं झुकली होती.

सकाळपासून आम्ही अभिमानाने छत्रपतींच्या छायेत फिरताना हे काय पाहून बसलो याचा चांगलाच पच्यताप झाला. चित्रपटात पुढे काहीतरी चांगलं पाहायला मिळेल ह्या आशेने पुढे चित्रपट पाहत राहिलो. सुरवातीपासून शेवटपर्यंत ह्यात दिग्दर्शकाला काय साधायचं हेच समजलं नाही. आयुष्यात पहिल्यांदा चित्रपट पाहून थिएटर मधून बाहेर निघताना मान शरमेनं खाली झुकलेली होती. दुसऱ्यादिवशी फेसबुक उघडलं आणि एका मराठी पेजवर चित्रपटाची स्तुती आणि चित्रपटाने किती कमावले, तुम्ही चित्रपट पहा असा मजकूर पाहून पेज डोक्यात गेलं. काहीही न पाहता आधी पेजला डिसलाईक केलं. आणि आता मला चित्रपटा बद्दल काय वाटतं ते लिहायचं ठरवलं… हे माझं मत आहे कदाचित तुम्हाला हे आवडणार नाही पण तुम्हाला ह्यावर थोडा विचार नक्की करायला लावेल..

गेल्या २ वर्षांत एकही मराठी चित्रपट फारसा चालला नाही. पण लहान मुलांवर त्यांच्या लव्ह स्टोरीज दाखवून घाणेरडी भाषा वापरून दाखवले गेलेले चित्रपट तुफान चालतात. हेच खूप सध्या मराठी इंदूस्ट्रीत पाहायला मिळतंय. शाळा, टाईमपास, बीपी, सैराट, फॅन्ड्री असे चित्रपट नेहमी हाउसफुल होतात. ह्याचाच फायदा घेऊन आता निर्माते अश्याच प्रकारचे चित्रपट बनवताना पाहायला मिळताहेत. मराठी चित्रपटांचा दर्जा खूप घसरलाय हि खरी गोस्ट आहे आणि तितकीच विचार करायला लावणारी. मीही नुकतीच कॉलेजमधून बाहेर पडलेय मलाही असे चित्रपट पाहायची इच्छा आहे पण हा चित्रपट अश्या चित्रपटाचा अंत असावा परिसीमा गाठणारा असावा असं माझं मत आहे. मराठी चित्रपट मंडळाने ह्यावर अक्षेप का घेतला नाही हे मोठं गूढ आहे. खरतर आपणच लाज सोडलीय छत्रपतींच्या छत्राखाली वाढणारे मराठमोळे मुलं आणि मुली तसेच पालक यांनी ह्यावर नक्की आवाज उठवावा नाहीतर येणाऱ्या पिढीला विशेषता मुलींना अश्या चित्रपटांमुळे खूप त्रास होणार हे नक्की.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *