“मिस्टर बिन” यांच्या ह्या सुंदर मुलीचे फोटो होताहेत व्हायरल

मी. बिन” हे अभिनेते, विनोदवीर आणि संवाद लेखक म्हणून ओळखले जातात. त्यांचे खरे नाव आहे “रोवन एटकिन्सन”. परंतु मी. बिन या कॉमेडी शोमुळे त्यांना ह्याच नावाने ओळखले जाते. कुठलेही वाक्य न बोलता केवळ चेहऱ्यावरील हावभावामुळे ह्या अभिनेत्याने अख्या जगाला हसवले आहे. आजही बऱ्याच जणांना मी. बिनचे शो बघायला नक्की आवडेल यात शंका नाही. ६ जानेवारी १९५५ रोजी इंग्लड मधील कसेट या छोट्याशा गावी रोवन यांचा जन्म झाला.एटकिन्सन कुटुंबातील चार भावंडातील रोवन हे सर्वात धाकटे.

“द एटकिन्सन्स पीपल” हा बीबीसी वरील शो त्यांनी सादर केला आणि भरपूर प्रसिद्धी मिळवली. १९९० साली “सुनेत्रा शास्त्री” या मेकअप आर्टिस्ट सोबत त्यांनी लग्न केले. मुलगी लिली आणि मुलगा बेंजामिन ही अपत्ये त्यांना झाली. परंतु दोघांनी २०१४ साली विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
२००१ साली केनिया ट्रिप दरम्यान प्लेनचा पायलट बेशुद्ध झाला. तो शुद्धीत येईस्तोवर मी बिन यांनी पायलटची जबाबदारी पार पाडली होती. त्यांना वेगवेगळ्या कारची देखील भयंकर आवड आहे. त्यांच्या कार कलेक्शनमध्ये अनेक नामवंत ब्रँडच्या गाड्या पाहायला मिळतात. एका अपघातात मी बिन यांच्या गाडीचे नुकसान झाले त्यात त्यांना गंभीर दुखापत देखील झाली होती. मजेशीर बाब म्हणजे ब्रिटनमध्ये ह्या घटनेमुळे विमा कंपनीला तब्बल १० लाख पौंड एवढि नुकसान भरपाई द्यावी लागली होती.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *