मिनिटाला बदलणारे हिरो- हिरोईनचे एवढे महागडे कपडे शेवटी जातात कुठे? जाणून घेण्यासाठी फोटोवर

चित्रपटात हिरो हिरोईन यांच्यासाठी वापरण्यात येणारे कपडे नेमके कुठे जातात? हा प्रश्न बहितेक जणांना पडला असेल. कारण या वापरल्या जाणाऱ्या कपड्यांवर खूप सारा खर्च केला जातो.” देवदास” या चित्रपटात माधुरी दीक्षित आणि ऐश्वर्या राय यांच्या साड्यांची किंमत २५ ते ३० लाख इतकी सांगितली जात होती. तसेच “ऍकशन रिप्ले ” या चित्रपटासाठी ऐश्वर्या राय हिने तब्बल १२५ ड्रेस बदलले होते. त्यामुळेच मिनटा- मिनिटांत बदलले जाणारे हे कपडे शेवटी कुठे जातात? हा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो. म्हणूनच याविषयी जाणून घेऊयात…

चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर वापरण्यात येणारे सगळेच कपडे एका पेटीत बंद करून ठेवण्यात येतात. पुढे हेच कपडे दुसऱ्या चित्रपटातील मुख्य कलाकाराला सोडून इतरांसाठी वापरण्यात येतात. दुपट्टा, घागरा याची जोडी दुसऱ्या कापड्याबरोबर मॅच करून पुन्हा हे कपडे वापरले जातात. कधीकधी एखाद्या मुख्य कलाकाराला यातील कपडे आवडले किंवा एक आठवण म्हणून एखाद्याला ते घरी न्यावेशे वाटले तरी त्यांना तशी परवानगी दिली जाते. या सर्व कपड्यांच्या खर्चाचा समावेश प्रोडक्शन हाऊस मध्ये केलेला असतो. असेही सांगण्यात येते की, कधीकधी या कपड्याची बोली देखील लावली जाते. यातून मिळणारा पैसा गरिबांच्या मदतीसाठी वापरण्यात येतो.
आजकाल टीव्ही मालिकेत देखील अशाच भारी कपड्याचा सर्रास वापर होताना दिसतो. वेगवेगळ्या मालिकेत वापरले जाणारे कपडे पुन्हा ओळखू न यावेत यासाठीची खबरदारी घेतली जाते.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *