मिथुन यांनी कचराकुंडीत सापडलेल्या मुलीला दत्तक घेऊन मुलीप्रमाणे सांभाळले. नक्षलवादी ते बॉलीवूड मिथुनदाचा प्रवास नक्की वाचा

मिथुन चक्रवर्ती यांचं खर नाव ‘गौरांग चक्रवर्ती’ अस आहे. बॉलीवूड मध्ये पदार्पण करण्याआधी मिथुनदा म्हणजेच गौरांग चक्रवर्ती हा एक कट्टर नक्षलवादी होता. अत्यंत गरीब आणि हलकीच जीवनाला कंटाळून त्याने नक्षलवादी संघटनेत पदार्पण केलेले. पण पुढे त्याच्या सख्या भावाचे विजेच्या करंट लागून निधन झाले आणि तो पुन्हा त्याच्या घरी परतला. आपण काहीतरी चूक करतोय हे लक्षात आले. नक्षलवादी संघटना सोडली पण नक्षलवादी आपल्याला जीवे मारतील ह्या भीतीने तो तेथून थेट पुण्यात आला.

पुण्यातील भारतीय फिल्म और टेलीविजन संस्थान, डेक्कन जिमखाना पुणे येथे येऊन छोटी मोठी कामे करू लागला. तिथेच त्याने अभिनयाचे धडे ही गिरवले. जेंव्हा मिथुन नक्षलवादी होता तेव्हा त्याला तेथे मार्शल आर्ट (लढाईची निपुणता) हि अवगत होती. पुण्यातच तो चांगली हिंदी भाषा बोलायला शिकला. तब्ब्ल ५ वर्ष पुण्यात काढल्यानंतर तो पुन्हा बंगालला गेला. तिथे त्याची ओळख ‘मृणाल सेन’ ह्या दिगदर्शकाशी झाली आणि त्यांनी त्याला “मृगया” चित्रपटात काम करायची संधी दिली. पहिल्याच चित्रपटात त्याला सर्वश्रेष्ठ अभिनेता म्हणून राष्ट्रीय फिल्म पुरस्कार मिळाला, आणि त्याला बॉलीवूड चित्रपटासाठी कामे मिळू लागली.

दो अनजाने, मुक्ति , सुरक्षा, अमर दीप, हम पाँच, आदत से मजबूर, डिस्को डांसर, मुझे इंसाफ चाहिए, कसम पैदा करने वाले की, ग़ुलामी, जीते हैं शान से, अग्निपथ असे एकचढ़ एक चित्रपट मिळत गेले, आणि त्यात तो चांगला यशस्वी हि होत गेला.

पुढे मिथुनदाने योगिता बाली यांच्याशी लग्न केलं. योगिता बाली आणि मिथुन याना ३ मुले आहेत. त्यातील मोठा मिमो चक्रवर्ती यांनी जिमी ह्या चित्रपटापासून बॉलीवूड मध्ये पदार्पण केले. तर मधला रिमो चक्रवर्ती यांनी देखील फिर कभी या चित्रपटातून पदार्पण केले. तर सर्वात लहान नमाशी चक्रवर्ती हा बॉलीवूड मध्ये पदार्पण करण्यास सज्ज आहे. ह्या तिघं व्यतिरिक्त मिथुनला एक मुलगीही आहे. पण ती त्याची सख्खी मुलगी नसून त्याला ती एका कचराकुंडीत सापडली होती.

होय! दिशानी चक्रवर्ती हि मिथुनला चक्क कचराकुंडीत सापडलेली. त्याचे झाले असे कि कलकत्याच्या एका न्युज पेपरने अशी न्यु दिली कि एक मुलगी त्यांना कचराकुंडीत सापडली आहे. जर कोणी तिला दत्तक घेण्यास उत्सुक असेल तर त्यांनी पुढे यावे. हि बातमी जेव्हा मिथुनदाला समजली तेव्हा योगिता बाली आणि मिथुन दोघे तिला दत्तक घेण्यास तय्यार झाले. तिला स्वतःच्या मुलीप्रमाणे जपले. सध्या दिशानी हि ‘न्यूयॉर्क फिल्म अकादमी’ मध्ये अभिनयाचे धडे घेतेय.

अशीही न्युज येतेय कि दिशानी चक्रवर्ती हि बॉलीवूड मध्ये पदार्पण करतेय. चक्क सलमान खान तिला बॉलीवूडमध्ये लाँच करतोय. विशेष म्हणजे सलमान हा मिथुनदांच्या मोठा फॅन आहे आणि दिशानी चक्रवर्ती हि सलमानची मोठी फॅन आहे.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *