“माहेरची साडी” ३ रुपयांच्या तिकिटावर १४ कोटीचे कलेक्शन, बॉलीवूडच्या या अभिनेत्रीने प्रमुख भूमिकेसाठी दिला होता नकार

“माहेरची साडी” हा मराठी चित्रपट ९० च्या दशकातील सुपरडुपर हिट चित्रपट ठरला. अगदी हिंदी सिनेमालाही लाजवेल इतका तो महाराष्ट्राच्या प्रेक्षकांनी उचलून धरला होता. त्याकाळी ३ रुपयांच्या तिकिटावर १४ कोटींचे कलेक्शन या चित्रपटाने जमवले होते. चित्रपटात प्रमुख भूमिका अल्का कुबल यानि साकारली होती.या भूमिकेमुळे त्या महाराष्ट्राच्या घराघरात जाऊन पोहोचल्या होत्या. खरं तर “माहेरची साडी” चित्रपटाचे दिग्दर्शक विजय कोंडके यांच्या मनात या भूमिकेसाठी वेगळ्याच अभिनेत्रीचे नाव होते.त्यावेळी सलमान खान आणि मराठमोळी भाग्यश्री पटवर्धन यांची प्रमुख भूमिका असलेला” मैने प्यार किया” चित्रपट हिट ठरला होता.

त्यामुळे ही हिट अभिनेत्री आपल्या चित्रपटात आल्यास मराठी चित्रपट खूप चालेल यासाठी विजय कोंडके तब्बल ६ महिने भाग्यश्री पटवर्धन कडे चकरा मारत होते. परंतु हिंदीत नाव कामावल्यामुळे भाग्यश्रीने त्यांचा हा प्रस्ताव नाकारला. मग असिस्टंट डायरेक्टर पितांबर काळे आणि एम एस वैद्य यांनी या भूमिकेसाठी अल्का कुबल यांचे नाव सुचवुन त्यांना बोलावण्यात आले. त्यावेळी “लेक चालली सासरला ” चित्रपटामुळे अल्का कुबल प्रसिद्धीच्या झोतात होत्या. एक आघाडीची अभिनेत्री असून या भूमिकेसाठी त्यांना तीनपटीने कमी मानधन मिळाल्याने हा चित्रपट नाकारून त्या तेथून निघून गेल्या. परंतु पितांबर काळे यांनी अल्का कुबल यांची समजूत घालून या भूमिकेसाठी राजी केले.
कोंडके बॅनर चा चित्रपट असल्याने ५१ दिवस “माहेरची साडी” हा चित्रपट थेटरमध्ये कसा बसा तग धरून बसला.परंतु अवघ्या सहा आठवड्यात या चित्रपटाने उसंडी मारली आणि अक्षरशः हा चित्रपट महाराष्ट्रभर धो धो चालू लागला. त्या काळी गावोगावी जत्रेमध्ये हा सिनेमा प्रेक्षकांची गर्दी करू लागला .थेटर मालक तिकिटाचे पैसे अक्षरशः गोणीत खचाखच भरायचे.पैसे मोजायलाही त्यांना वेळ मिळत नसे.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *