मालिकेतील जयदीप सरंजामे यांचे खरे वडील कोण आहेत हे पाहून शॉक व्हाल

झी मराठीवरील “तुला पाहते रे” मालिका सध्या चांगल्याच फॉर्ममध्ये चालतेय. मालिका जसजशी मालिका पुढे जात गेली तसतसा प्रेक्षकांनीही पाहण्याचा दृष्टिकोन बदलत मालिका डोक्यावर घेतली. तुम्हाला हे माहीतच असेल कि निळुफुले यांची कन्या ह्या मालिकेतील अभिनेत्री गायत्री दातार हिच्या आईची भूमिका साकारतेय. असेच आणखीन एक पात्र ह्या मालिकेत आहे ते म्हणजे जयदीप सरंजामे. जयदीप सरंजामे यांच्या वडिलांचे नाव ऐकून तुम्हाला शॉक लागल्याशिवाय राहणार नाही.

तुला पाहते रे मालिकेत सरंजामे परिवारातील जयदीप सरंजामे ह्यांची व्यक्तिरेखा साकारणारा अवली कलाकार “आशुतोष गोखले” हा प्रसिद्ध अभिनेते “विजय गोखले” यांचा मुलगा आहे. काय तर मग लागलाना शॉक. विजय गोखले यांनी दूरदर्शनवरील ” श्रीमान श्रीमती ” ही हिंदी विनोदी मालिका गाजवली होती. या मालिकेतील भूमिकेमुळे ते घराघरात जाऊन पोहोचले. सालीने केला घोटाळा, ही पोरगी कोणाची, पोलिसाची बायको यासारख्या अनेक चित्रपटात त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. दम असेल तर, भरत आला परत यांचे अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.
विजय गोखले याना एक मुलगीही आहे पण ती अभिनयापासून खूप दूर स्वतः डेंटिस्ट असून स्वतःच क्लीनिक सांभाळते. तर विजय गोखले यांची पत्नी देखील डॉक्टरच आहेत.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *