“मार्क झुकरबर्ग” अब्जाधीश तरुण रोज एकसारखेच कपडे का घालतो? तेही इतक्या कमी किमतीचे.. हे वाचून तुमचे डोळे उघडतील वाचा

फेसबुकचा सर्वेसर्वा मार्क झुकरबर्ग याना तुम्ही ओळखतच असाल. जगातील ५ व्या क्रमांकाचा सर्वात अमीर व्यक्ती म्हणून त्याची गिनती होते, इतकच काय तर येत्या काही काळात तो जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखला जाईल. तुम्ही त्याचे अनेक फोटो हि पहिले असतील पण तुमच्या हे लक्षात आलं का कि तो नेहमी “ग्रे कलरचा टी-शर्ट” घालतो. तो टी-शर्ट हि अगदी साधा आणि कमी किमतीचा असतो. त्याचं प्याटर्न हि अगदी एक सारखं. नुकताच त्याने ह्याचं स्पष्टीकरण दिलय, तुम्हाला ते वाचून आश्चर्याचा धक्का बसेल.

एकदा एका कॉलेजच्या कार्यक्रमात त्यांना हा प्रश्न विचारला गेला, कि तुम्ही नेहमी एकसारखे कपडे परिधान का करता? त्यावर मार्क झुकरबर्ग हसले आणि बोलले ” मी एक अत्यंत साधा माणूस आहे, त्यामुळे मला स्पष्ट बोलायला आवडत. मी करोडो लोकांसाठी काम करतो मी नेहमी त्याच विचारात असतो कि लोकांसाठी आणखीन कोणकोणत्या सुविधा देऊ शकेन. माझं आयुष्य खूप सुंदर आहे मी त्यात खूप सुखी आहे. मग मी कोणते कपडे घालतो ते कोणत्या रंगाचे असतात अश्या शुल्लक गोष्टींचा विचार मी का करू? जर मी माझ्याकडे लक्ष्य केंद्रित करत बसलो तर ह्यात माझं खूप मोठं नुकसान आहे.”
आश्चर्य म्हणजे ह्या कॉलेजच्या कार्यक्रमानंतर त्यांनी आपल्या फेसाबुकं अकाउंटवर त्यांच्या कपड्यांचा एक फोटो शेअर केला ज्यात काही “ग्रे कलरचे टी-शर्ट होते. सांगायचं तात्पर्य फक्त एवढच कि आपण फालतू गोष्टींकडे लवकर आकर्षित होतो. लोक आपल्याला काय म्हणतील आपण नेहमी चांगलं दिसायला हवं ह्यामुळे आपल्याला काय करायचंय ह्यापासून आपलं दुर्लक्ष होत. जर तुम्ही कामाशी एकनिष्ठ असाल तर तुम्हाला लोक तुमच्या कर्तृत्वामुळे ओळखतील मग तुम्ही कोणतेही कपडे घातलेले असोत.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *