suresh wadkar wedding kissa

सुप्रसिद्ध गायक यांनी सुरेश वाडकर यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात पार्श्वगायन केले आहे. पण खूपच कमी लोकांना हे माहित आहे कि मराठी हिंदी व्यतिरिकही काही भोजपुरी, कोकणी, मल्याळी, गुजराती, बंगाली, सिंधी चित्रपटांतूनही आणि उर्दू भाषेतूनही त्यांनी गाणी गायली आहेत. भावगीते, भक्ती गीते आणि सुगम संगीतही ते उत्कृष्टरित्या सादर करतात. एका बॉलीवूड मधील प्रसिद्ध वेबसाईटने सुरेश वाडकर आणि माधुरी दीक्षित यांच्या लग्नाबाबत एक आर्टिकल लिहलं ते प्रचंड गाजलं. त्यात असं लिहलं होत कि सुरेश वाडकर याना माधुरी दीक्षित यांच्या आई वडिलांनी माधुरीसाठी लग्नाचा प्रस्ताव मांडला होता. पण सुरेश वाडकर यांनी माधुरी दीक्षित खूप सडपातळ असल्याने हे लग्न अमान्य करत माधुरीला ना पसंत केलं.

suresh wadkar family pic
suresh wadkar family pic

वेबसाईटचा लेखक इतक्यावरच थांबला नाही तर माधुरीचा लग्न झालं नाही म्हणून तिला चित्रपटात काम करायची संधी मिळाली आणि माधुरी सुपरस्टार बनली. एका प्रसिद्ध वेबसाईटने हे सोशिअल मीडियावर चांगलंच व्हायरल केलं आणि ह्यामुळे इतर वेबसाईट आणि यूट्यूब चायनलनेही हि बातमी वाऱ्यासारखी पसरवेली. त्यामुळे सत्य काय आहे हे सुरेश वाडकरांना सांगणं गरजेचं होत. सुरेश वाडकर याना एका कार्यक्रमांत मकरंद अनाजपूरे यांनी हाच प्रश्न केला कि माधुरी दीक्षित हिच्या आई वडिलांनी खरंच माधुरीसाठी तुमच्यावाडे लग्नाचा प्रस्ताव मांडला होता का? आणि तो तुम्ही अमान्य का केला? ह्यावर सुरेश वाडकर हसले आणि म्हणाले “माधुरी दीक्षित सारख्या सुंदर मुलीला मी लग्नासाठी अमान्य का करेन. मुळात माझ्याकडे असा कोणताही लग्नाचा प्रस्तावच आला नाही. आणि जर आला इतक्या सुंदर मुलीचा लग्नासाठी प्रस्ताव आला असता तर मी लग्नाला होकारच दिला असता”. माझी आणि माधुरीची ओळख एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान झालेली ह्या पूर्वी माधुरीने आणि मी देखील माधुरीला पूर्वी कधीच पाहिलं नाही. पण माधुरीला मी चित्रपटात बऱ्याचदा पाहिलं होत. सुरेश वाडकरांनी दिलेल्या ह्या उत्तराने मकरंद अनासपुरे आणि तेथे जमलेल्या प्रेक्षकांना हसू आवरले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *